Thursday, September 19, 2024
Homeक्राईमNashik Crime News : अट्टल घरफोड्या ताब्यात; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

Nashik Crime News : अट्टल घरफोड्या ताब्यात; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

सात तोळे सोनेही हस्तगत

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

पंचवटी परिसरात (Panchvati Area) गेल्या चार महिन्यात घरफोड्या (Burglary) करणाऱ्या अट्टल घरफोड्या संशयिताला पंचवटी पोलिसांनी (Panchvati Police) जेरबंद केले आहे. निमाणी बसस्थानक परिसरातून अटक करण्यात आलेल्या या संशयिताकडून २ लाख ८४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिस चौकशीतून आणखी गुन्हे उकल होण्याची शक्यता आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अस्लम अतिफ शेख असे अटक करण्यात आलेल्या अट्टल चोरट्या संशयिताचे नाव आहे. पंचवटी परिसरात सातत्याने घरफोड्यांचे सत्र सुरू असल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी गुन्हेशोध पथकाला सूचना करीत गुन्ह्यांची उकल करण्यासाठी सांगितले होते. दरम्यान, पोलीस अंमलदार संदीप मालसाने यांना संशयित अस्लम हा निमाणी बसस्थानक (Nimani Bus Stand) परिसरात येणार असल्याची खबर मिळाली होती.

त्यानुसार, पथकाने सापळा रचला आणि अस्लम यास अटक (Arrested) केली. पोलिस चौकशीतून त्याने तीन घरफोड्यांची कबुली दिली आहे. या घरफोड्या त्याने साथीदार पोपट शंकर कणिंगध्वज याच्या मदतीने गेल्या चार महिन्यात केल्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून तीन घरफोड्यातून चोरलेले सात तोळे सोन्याचे दागिने आणि २ मोबाईल असा २ लाख ८४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दरम्यान, या गुन्ह्याचा तपास हवालदार दीपक नाईक हे करीत असून ही कामगिरी गुन्हेशोध पथकाचे सहायक निरीक्षक विलास पडोळकर, सागर कुलकर्णी, दीपक नाईक, अनिल गुंबाडे, महेश नांदुर्डीकर, कैलास शिंदे, संदीप मालसाने, निलेश भोईर, राकेश शिंदे, अंकुश काळे यांच्या पथकाने केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या