Saturday, March 29, 2025
Homeनगरचार पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील ‘पांढरीपूल’ अवैध धंद्यांसाठी वरदान

चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील ‘पांढरीपूल’ अवैध धंद्यांसाठी वरदान

गणेशवाडी |वार्ताहर| Ganeshwadi

चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीत असणारे पांढरीपूल सध्या अवैध धंद्यांना वरदान ठरत आहे. सोनई पोलीस, पाथर्डी पोलीस, एमआयडीसी पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा नगर यांच्या हद्दीत असणारे पांढरीपूल हे नगर-संभाजी नगर हायवे इमामपूर घाटाच्या पायथ्याशी असलेले ठिकाण. या ठिकाणची भेळ ही प्रसिद्ध आहे. या ठिकाणी अनेक हॉटेल व्यावसायीकांनी आपला जम बसवला आहे. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच वर्दळ सुरू असते. अगदी याचाच फायदा उठवत या अवैध धंद्येवाल्यांनी हॉटेल व्यावसायिकांना पैशाचे आमीष दाखवत आपले बस्तान या ठिकाणी मांडले आहे.

- Advertisement -

गाडी जेवणासाठी थांबली की त्या गाडीतील स्टिल असेल, लोखंड असेल, डिझेल असेल यांची चोरी करून त्या ठिकाणाहून रातोरात दुसरीकडे ते पसार करतात. काही तर पोलिसांचा आशीर्वाद असल्याने त्याची राजरोसपणे त्याच ठिकाणी पत्र्याच्या आडोशाला विक्री देखील करतात. मटका, बिंगो, जुगार, वेश्याव्यवसाय, विनापरवाना दारू विक्री यांनी तर उच्छादच मांडला आहे. गेल्याच महिन्यात या ठिकाणाहून सेवानिवृत्त जिल्हा अधिकारी यांच्या मुलाचे पैशासाठी अपहरण करण्यात आले होते. तशी फिर्याद देखील सोनई पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.

नशीब बलवत्तर म्हणून त्याची सुटका झाली. या ठिकाणी अपघाताचे प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. या ठिकाणचे राहणारे स्थानिक रहिवासी या सर्वांना आता कंटाळले आहेत. त्यामुळे वरिष्ठांनी याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. नाही तर या परिसरात दिवसा लुटमार होऊन या रोडवरून प्रवास करणे देखील मोठ्या जोखमीचे होऊन बसणार आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

0
नाशिकरोड | प्रतिनिधी Nashikroad नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या गांधीनगर जवळील विजय ममता चित्रपटगृहाजवळ ट्रॅक्टरची वाहतूक करणाऱ्या ट्रकची एका तरुणाला जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात एक युवक...