पंढरपुर : येथील प्रसिद्ध विठ्ठल-रखुमाई मंदीरामध्ये एक जानेवारीपासून मोबाईल घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान येत्या ०१ जानेवारीपासून ही बंदी लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे पुन्हा नव्या वादाला तोंड फुटणार असल्याची चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे.
दरम्यान मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला असून मात्र सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतल्याचे मंदिर प्रशासनाचे म्हणणे आहे. मंदिर प्रशासनाने सांगितले कि, मंदिरात मोबाईल लॉकर्स उघडून भाविकांकडून पैसे उकळले जातात. त्यामुळे भाविकांची फसवणूक होते. परिणामी मंदिर प्रशासनास जबाबदार धरले जाते. त्यामुळे मोबाईलवर बंदी घालण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वीच भाविकांच्या मागणीवरून येथील प्रशासनाने मोबाईलवर बंदी घातली होती. कालांतराने बंदी उठवत मोबाईल वापरण्यास परवानगी दिली होती. परंतु आता पुन्हा मोबाईलवर बंदी आणल्याने भाविकांना त्रास होणार आहे.