नवी दिल्ली | New Delhi –
भारतीय शास्त्रीय संगीताचे दिग्गज पद्मविभूषण पंडित जसराज यांचं निधन झालं आहे. त्यांनी अमेरिकेतील न्यूज जर्सी येथे वयाच्या ९० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पंडित जसराज यांच्या जाण्यामुळे संपूर्ण संगीत आणि कला विश्वावर शोककळा पसरली आहे. भारत सरकारने २००० मध्ये संगीत क्षेत्रातल्या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरवले होते. pandit jasraj passed away
पंडित जसराज यांचा जन्म 24 जानेवारी 1930 ला झाला. शास्त्रीय गायकांपैकी ते एक भारतातील प्रसिद्ध गायक आहेत. जसराज हे मेवाती घराण्यातील आहेत. जसराज हे जेव्हा चार वर्षांचे होते त्यांच्या वडिलांचं म्हणजे पंडित मोतीराम यांचं निधन झालं. त्यानंतर मोठा भाऊ पंडित मनीराम यांनीच जसराज यांची जबाबदारी घेतली आणि त्यांना लहानाचं मोठं केलं.
पंडित जसराज यांचं काम ऐवढं मोठं आहे की आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघानं (आयएयू) 11 नोव्हेंबर 2006 रोजी सापडलेल्या एका ग्रहाला पंडित जसराज यांच्या सन्मानार्थ “पंडितजराज” असं नाव दिलं आहे. त्यामुळे त्यांच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे.