Video : तब्बल १३ वर्षांनंतर मुंडे बंधु-भगिनींचं एकत्रित रक्षाबंधन

jalgaon-digital
2 Min Read

मुंबई | Mumbai

भाजपच्या (BJP) राष्ट्रीय सचिव व माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी तब्बल १३ वर्षांनंतर एकत्रित रक्षाबंधनाचा (Rakshabandhan) सण साजरा केला. रात्री उशिरा कृषीमंत्री धनंजय मुंडे हे पंकजा मुंडे यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. त्यानंतर तिन्ही बहिणींकडून धनंजय मुंडेंनी राखी बांधून घेतली. यावेळी पंकजा मुंडेंच्या आई प्रज्ञा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे (MP Pritam Munde) आणि यशश्री मुंडे या देखील उपस्थित होत्या.

Bacchu Kadu : सचिन तेंडुलकरांच्या घराबाहेर बच्चू कडूंचे कार्यकर्त्यांसह आंदोलन; पोलिसांनी घेतले ताब्यात

धनंजय मुंडे यांनी २००९ मध्ये राष्ट्रवादी (NCP) पक्षात प्रवेश केला होता. यानंतर मुंडे बंधू-भगिनींमध्ये रक्षाबंधनाच सण साजरा झालेला नव्हता. मात्र, यंदा तब्बल १३ वर्षांनंतर मुंडे बहिण-भावंडांनी रक्षाबंधनाचा सण साजरा केला. त्यांच्या या रक्षाबंधनाच्या फोटो आणि व्हिडीओ मुंडे बंधु-भगिनींच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर (Social Media) जोरदार व्हायरल केले आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर; आता सर्वोच्च न्यायालयात ‘या’ तारखेला होणार सुनावणी

दरम्यान, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर हे बंध रेशमाचे…, असं म्हणत फोटो शेअर केले आहेत. त्यांच्या या फोटोंना मुंडे समर्थकांची मोठ्या प्रमाणावर पसंती मिळते आहे. तर दुसरीकडे दरवर्षी रक्षाबंधनानिमित्त अजित पवारांना (Ajit Pawar) राखी बांधणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी यंदा राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर अजित पवारांना राखी बांधली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्यात सर्वत्र या बहिण-भावांच्या रक्षाबंधनाची चर्चा होत आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

रक्षाबंधनासाठी जाताना कारचं टायर फुटलं, गाडी धरणात कोसळली; मुलीचा बुडून मृत्यू

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *