Friday, April 25, 2025
HomeराजकीयPankaja Munde: राजीनामा पेक्षा त्यांनी मंत्रीपदाची शपथच घ्यायला नको होती; पंकजा मुंडे...

Pankaja Munde: राजीनामा पेक्षा त्यांनी मंत्रीपदाची शपथच घ्यायला नको होती; पंकजा मुंडे यांची पहिली आणि रोखठोक प्रतिक्रिया

मुंबई । Mumbai

बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे क्रूर फोटो समोर आल्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उमटली आहे. वाल्मिक कराड याचं नाव हत्या प्रकरणातील आरोपपत्रात आल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला आहे. मुंडेंचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारला आहे.

- Advertisement -

दरम्यान त्यांच्या या राजीनाम्यानंतर पंकजा मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. “राजीनामा झाला. मी त्याचं स्वागत करते. हा राजीनामा आधीच यायला हवा होता. राजीनामा पेक्षा त्यांनी मंत्रीपदाची शपथच घ्यायला नको होती. त्यामुळे हे सर्व पुढे झालं नसतं” असं रोखठोक मतंच पंकजा मुंडे यांनी मांडलं. “ज्यांनी राजीनामा घेतला तो आधीच घ्यायला हवा होता, धनंजयनेही तो (राजीनामा) आधीच द्यायला हावा होता. त्यामुळे गरीमा राखता आली असती. त्या परिवार आणि कुटुंबाच्या दुखापुढे राजीनामा ही काहीच गोष्ट नाही. त्यांनी घेतला. मला वाटतं ते देर आये दुरुस्त आए” असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट शब्दांत सुनावलं.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, “संतोष देशमुख यांना मारण्याच्या संदर्भातले काही व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाले .त्यातली एक पोस्ट मी पाहिली .हे व्हिडिओ उघडण्याची हिंमत झाली नाही .ज्यांनी त्यांना एवढ्या अमानुषपणे मारला आहे .मारून त्याचा व्हिडिओ केला आहे .त्यांच्यात जेवढी अमानुष्यता आहे ही अमानुषता पाहण्याची माझ्यात हिंमत नाही.

तसेच, “देशमुखांचा हत्यानंतर मी पहिल्यांदा मुख्यमंत्री महोदयांना पत्र दिलं होतं आणि १२ डिसेंबरला मी याच्यावर संपूर्ण भाषण आज आपण पहा ऑनलाईन आहे मी व्यक्त झालेली आहे आता यामध्ये कोण आहे काय नाही कोण आहात हे केवळ आणि केवळ तपास यंत्रणेलाच माहिती आहे त्यामध्ये कुठलाही हस्तक्षेप मी करण्याचे कारण नाही एवढे मात्र नक्की सांगते .ज्या मुलांनी ही हत्या केली आहे . त्यांच्यामुळे संपूर्ण राज्यातील समाज ज्यांचा काहीही दोष नाही तो समाज मान खाली घालून गंभीरपणे वावरत आहे .इतकी निर्घृण हत्या झाली हे पाहून समाज आक्रोशात वावरत आहे .समाज आणि जात यावर बोलायची गरज नाही पण परिस्थितीच अशी आहे. असाही त्या म्हणाल्या.

खरंतर समाज आणि जात यावर बोलायची गरज नाही, आता प्रत्येक गोष्ट जातीवर जाते,अमानुषपणे कोणाला संपवणाऱ्याला कोणतीही जात नसते. त्याच्यावर निर्णय घेणाऱ्या राज्यकर्त्याला जात नसली पाहिजे. जेव्हा या खूर्चीवर बसले तेव्हा मी शपथ घेतली आहे आमदारकीची शपथ घेतली, कुठलाही ममत्व भाव न बाळगता कुणाविषयी कुठलाही आकस द्वेष न बाळगता काम करायला पाहिजे यावर मी ठाम आहे. संतोष देशमुखांच्या निघृण हत्येवर निषेध व्यक्त करताना मी मनापासून त्यांच्या आईची क्षमा मागते. कारण, ज्या मुलांनी निघृण हत्या केलीय ते माझ्या पोटचे असते, पदरात असते तर त्यांना कडक शासन करा असं म्हटलं असतं. असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...