Tuesday, January 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजGauri Garje Death : अनंत गर्जेंच्या घरासमोरच गौरीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार; वडिलांनी फोडला...

Gauri Garje Death : अनंत गर्जेंच्या घरासमोरच गौरीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार; वडिलांनी फोडला टाहो, म्हणाले “तुम्हाला मुलगी असेल तर…”

अहिल्यानगर | Ahilyanagar

राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचे स्वीय सहायक (PA) अनंत गर्जे (Anant Garje) यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे यांनी वरळीच्या बीडीडी वसाहतीतील घरी गळफास घेऊन शनिवारी आत्महत्या केली होती. या घटनेनंतर अनंत गर्जे यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता, तर अनंत हा फरार होता. त्यानंतर काल (रविवारी) रात्री १ वाजता त्याने वरळी पोलिसांसमोर (Worli Police) आत्मसमर्पण केले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. यानंतर आज (सोमवारी) गौरी पालवे-गर्जे यांच्या पार्थिवावर अनंत गर्जे यांच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील मोहोज देवढे या मूळगावी घरासमोरच अंत्यसंस्कार करण्यात आले.

- Advertisement -

Pankaja Munde PA Anant Garje : डॉ. गौरी पालवे-गर्जे आत्महत्येप्रकरणी मुंडेंचा PA अनंत गर्जेला अटक

YouTube video player

मयत डॉ. गौरी पालवे-गर्जे (Gauri Palve-Garje) हिच्या नातेवाईकांनी अनंत गर्जे यांच्या घरासमोरच आपल्या मुलीवर अंत्यसंस्कार व्हावेत, असा आग्रह धरला होता. यावरुन गर्जे आणि पालवे यांच्या नातेवाईकांमध्ये बाचाबाची देखील झाली. मात्र, पोलिसांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला. यानंतर अनंत गर्जे यांच्या घराशेजारीच डॉ.गौरी पालवे-गर्जे यांच्या पार्थिवाला अग्नीडाग देण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस (Police) बंदोबस्त होता. सध्या गावात कडेकोट पोलीस बंदोबस्त असून, येथील परिस्थिती नियंत्रणात आहे.

गौरीच्या आई-वडिलांना फोडला हंबरडा

यावेळी गौरीचे वडील अशोक पालवे यांनी पोलिसांसमोर हात जोडत “जर तुम्हाला मुलगी असेल, तर मला न्याय द्या. श्रीमंताला मुलगी देऊ नका. त्यांच्या नादी लागू नका, गरिबाला मुलगी द्या, असे म्हणत टाहो फोडला. त्यांच्या या आक्रोशाने सगळेच जण सुन्न झाले होते. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला. मध्यस्थीनंतर अनंत गर्जे यांच्या दारात अंत्यसंस्कार न करता घराच्या बाजूला सरण रचून डॉ. गौरी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गौरीच्या आईवडिलांना हंबरडा फोडला.

ताज्या बातम्या