Sunday, April 19, 2026
Homeब्रेकिंग न्यूजAaditya Thackeray: शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या कार्याध्यक्षपदाच्या चर्चा; आदित्य ठाकरेंनी एका वाक्यात...

Aaditya Thackeray: शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या कार्याध्यक्षपदाच्या चर्चा; आदित्य ठाकरेंनी एका वाक्यात विषय संपवला

मुंबई | Mumbai
शिवसेनेच्या स्थापना दिनी ठाकरे गटात मोठे फेरबदल होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. २००३ मध्ये महाबळेश्वर येथील अधिवेशनात ज्याप्रमाणे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांची ‘कार्याध्यक्ष’ म्हणून निवड केली होती, अगदी त्याच धर्तीवर आता आदित्य ठाकरे यांची पक्षाच्या कार्याध्यक्षपदी वर्णी लागणार असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर आली होती. खासदार संजय राऊत यांनीही याबाबत पत्रकार परिषदेत उत्तर दिल्याने ही चर्चा अधिकच तीव्र झाली आहे. पण आता या विषयावर खुद्द आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून स्पष्टीकरण दिले आहे.

आगामी जून महिन्यात ठाकरे गटाच्या कार्यकारिणीची एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत आदित्य ठाकरे यांना कार्याध्यक्ष करण्याचा ठराव आणला जाण्याची शक्यता आहे. हा ठराव आल्यास एकमताने मंजूर होऊ शकतो. विशेष म्हणजे, १९ जून रोजी येणाऱ्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून या ऐतिहासिक निर्णयाची अधिकृत घोषणा केली जाणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र यावर खुद्द आदित्य ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

- Advertisement -

Anjali Damania: अजित पवारांच्या घराबाहेरील भानामतीशी खरातचा संबंध? अंजली दमानियांचा खळबळजनक दावा, नेमकं काय म्हणाल्या?

आदित्य ठाकरे नेमके काय म्हणाले?
आमदार आदित्य ठाकरे यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम लावला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “आज सकाळपासून काही टीव्ही चॅनेल्सवर बातमी आहे की मला पक्षात काही पद दिलं जाणार आहे. या बातमीत काहीही तथ्य नाही आणि अशी कुठलीही चर्चा पक्षात नाही. कृपया ह्याची सर्व माध्यमांनी नोंद घ्यावी! ” त्यामुळे शिवसेना ठाकरे गटात सध्या तरी याबाबतची कोणतीही चर्चा नसल्याचेच स्पष्ट झाले आहे. तसेच, आदित्य ठाकरेंकडे अजून तरी कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात येणार नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.

संजय राऊत काय म्हणाले होते?
“(आदित्य ठाकरेंबाबत) मला मीडियातून ही माहिती समजली. हे जे निर्णय असतात, ते पक्षात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली घेतले जातात. उद्धव ठाकरे कालांतराने पक्षाचे कार्याध्यक्ष झाले होते. आदित्य ठाकरे यांचे नाव समोर आले असेल तर स्वागत केले पाहिजे. मीडियातील माहितीवर हे बोलत आहे. अजून तरी असे काही ठरलेले नाही. तरुण पिढीच्या हाती नेतृत्व देताना या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. पुढचे राजकारण तरुणाच्या हातात गेले पाहिजे. खासगीमध्ये बोलण्याला अर्थ नसतो. पक्षाच्या संघटनेत चर्चा होत असते. मुंबई महापालिका किंवा इतर महापालिकांच्या निवडणुकीत आदित्य ठाकरे यांनी उत्तम काम केले आहे. त्यांच्या तरुणांच्या टीमने उत्तम काम केले आहे,” असे संजय राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते.

ताज्या बातम्या