Friday, May 3, 2024
Homeनाशिकनो स्कुल, नो फीस, फी कमी करण्यासाठी पालकांचे आंदोलन

नो स्कुल, नो फीस, फी कमी करण्यासाठी पालकांचे आंदोलन

नाशिक | Nashik

करोना काळातही पूर्ण फी घेत असल्याने मंगळवारी शहरातील पालकांनी एबनेझर इंटरनॅशनल स्कुलसमोर शांततेच्या मार्गाने आंदोलन केले.

- Advertisement -

गंगापूर या जवळील चांदशी येथे एबीनेझर इंटरनॅशनल स्कुल असून या ठिकाणी सहाशे ते सातशे विद्यार्थी शिक्षण घेतात. दरम्यान कोविड १९ मुळे सर्वच शाळा बंद आहेत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण सध्या सुरू आहे.

शहरात खासगी शाळांनी ऑनलाईन क्लासेसच्या आडून पालकांकडे फीसाठी तगादा लावला आहे. आज अखेर पालकांनी नो स्कूल नो फी हे आंदोलन सुरू केल आहे. कोरोनाच्या महामारीमुळे तुर्तास शाळा बंद ठेवण्याचे शासनाचे आदेश आहेत. तरीही काही खासगी शाळा फीसाठी पालकांना सक्ती करत आहेत. त्या आडून अव्वाच्या सव्वा शिक्षण शुल्क देखील आकारू लागल्या आहेत त्याविरोधात हे आंदोलन केले जात आहे.

दरम्यान एबीनेझर स्कुल पालकांकडून सक्तीने फी घेत असून ज्या पालकांकडून लेट फी मिळत असेल त्यांच्याकडून अधिक चार्ज घेतला जात आहे. याबाबत अनेक निवेदने देऊनही सदर शाळेने फी कमी केलेली नाही. लॉकडाऊनमुळे कंबरडं मोडलेल्या पालकांनी शाळा सुरू झालेल्या नसतानाही फी का भरायची असा सवाल आंदोलक पालकांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे सदर पालकांनी एकत्र येत शाळेसमोर आंदोलन केले. यावेळी सोशल डिस्टन्स राखत पालकांनी शांततेत आंदोलन केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या