Thursday, November 21, 2024
Homeक्रीडाParis Olympic 2024 : 'गोल्डन बॉय' नीरज चोप्राची कमाल; पहिल्याच थ्रोमध्ये अंतिम फेरीत...

Paris Olympic 2024 : ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राची कमाल; पहिल्याच थ्रोमध्ये अंतिम फेरीत धडक

नवी दिल्ली | New Delhi

भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) पहिल्याच थ्रोमध्ये अंतिम फेरी गाठली आहे. नीरजने पहिलाच थ्रो ८९.४३ मी.लांब टाकला आहे. त्यामुळे भारताची सुवर्णपदक (Gold Medal) मिळविण्याची आशा पल्लवित झाली आहे. तर नीरज चोप्रा पाठोपाठ पाकिस्तानचा (Pakistan) खेळाडू अरशद नदीमनेही पहिल्याच थ्रोमध्ये अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे आता भारताची नजर ॲथलेटिक्समध्ये दुसरे सुवर्णपदक मिळण्यावर आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : बांगलादेशमध्ये हिंसाचाराचा आगडोंब उसळला; हॉटेलात ८ जणांना जिवंत जाळलं

ऑलिम्पिकमध्ये पात्रता फेरीत ८४ मीटर भाला फेकल्यास थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळतो. हे अंतर गाठणारा खेळाडू फायनलसाठी पात्र ठरतो. त्या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी भालाफेकपटूंची पात्रता फेरी पार पडली. या फेरीत पहिल्याच प्रयत्नात नीरजने लक्ष्यापेक्षा ४ मीटर लांब भाला फेकला आणि फायनलमध्ये प्रवेश मिळवला. त्यामुळे तो आता सलग दुसऱ्यांदा सुवर्ण पदकाला गवसणी घालतो का याकडे तमाम भारतीयांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, भारतीय ॲथलेटिक्स विश्वाला सोनेरी दिवसांची अनुभूती देणारा गोल्डन बॉय नीरज चोप्रा पुन्हा एकदा नवे कीर्तिमान रचण्यासाठी ८ तारखेला मैदानात उतरणार आहे. टोकियो ऑलिम्पिकची पुनरावृत्ती करण्याबरोबरच १४० कोटी भारतीयांच्या अपेक्षांचे ओझे यावेळी नीरजच्या खांद्यावर असेल. तसेच त्याच्यासमोरचे आव्हान काहीसे कठीण असल्याचे बोलले जात आहे. कारण गेल्या काही काळापासून दुखापतींचा ससेमिरा नीरजच्या मागे लागला आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या