Wednesday, February 19, 2025
Homeक्रीडाParis Olympic 2024 : भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटचा अंतिम फेरीत प्रवेश

Paris Olympic 2024 : भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटचा अंतिम फेरीत प्रवेश

भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगटने इतिहास रचला आहे. अंतिम फेरीत प्रवेश करून पदक निश्चित केले आहे. मंगळवारी तिने महिलांच्या 50 किलो फ्रीस्टाइल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत क्युबाची कुस्तीपटू युस्नेलिस गुझमनचा 5-0 असा पराभव केला. आता विनेशची फायनल बुधवारी (7 ऑगस्ट) होणार आहे.

विनेश फोगट ऑलिम्पिकमध्ये महिला कुस्तीच्या अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू देखील ठरली आहे. त्यामुळे देशासाठी रौप्य पदक निश्चित केले आहे. याशिवाय सुवर्णपदक जिंकण्याची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे.

- Advertisement -

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या