Thursday, November 21, 2024
Homeक्रीडाParis Olympics 2024 : भारतासाठी ऑलिम्पिक स्पर्धेची निराशाजनक सुरुवात!

Paris Olympics 2024 : भारतासाठी ऑलिम्पिक स्पर्धेची निराशाजनक सुरुवात!

पॅरिस । Paris

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ ला सुरुवात झाली आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रीडा महाकुंभाचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी (२६ जुलै) पार पडला. पॅरिसमध्ये १०० वर्षांनंतर ऑलिम्पिकचं आयोजन केलं जात आहे. पण ऑलिम्पिकच्या पहिल्या दिवशी नेमबाजीत भारताच्या पदक जिंकण्याच्या आशेला धक्का बसला.

- Advertisement -

कारण १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक स्पर्धेत (10m Air Rifle Mixed Team event) दोन्ही भारतीय जोड्या अंतिम फेरीत स्थान मिळवू शकल्या नाहीत. १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिकमध्ये भारतीय संघातील रमिता जिंदाल (Ramita Jindal) आणि अर्जुन बाबुता (Arjun Babuta) यांनी ६२८.७ गुणांसह सहावे स्थान मिळवले.

हे ही वाचा : लाडकी बहीण योजनेसाठी निधी नाही? अजित पवारांनी विरोधकांना दिलं उत्तर

तर इलावेनिल वालारिवन (Elavenil Valarivan) आणि संदीप सिंह (Sandeep Singh ६२६.३ गुणांसह १२ व्या स्थानावर राहिले. दोन्ही जोड्या टॉप ४ स्थानाच्या बाहेर गेल्या. जे पदक फेरीत जाण्यासाठी आवश्यक होते.

रमिता जिंदाल आणि अर्जुन बाबुता जोडी पात्रतेच्या सर्वात जवळ पोहोचले होते. पण अखेर ६२८.७ गुणांसह त्यांना सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्यांचे टॉप ४ स्थान थोडक्यात हुकले. त्यांचा नॉर्वे आणि जर्मनीपेक्षा केवळ एक गुण कमी पडला. या दोन देशांच्या जोडीने ६२९.७ गुण मिळवत कांस्यपदकाच्या लढतीत प्रवेश केला.

हे ही वाचा : अजित पवारांना मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत…

नेमबाजीतील मिश्र सांघिक स्पर्धेत निराशजनक कामगिरीनंतर आता पुरुषांच्या १० मीटर एअर रायफलमध्ये भारतीय खेळाडूंकडून मोठ्या अपेक्षा आहेत. पुरुषांच्या १० मीटर एअर रायफलची पात्रता फेरी सुरु झाली आहे. भारताचा अर्जुन सिंग चीमा आणि सरबजोत या स्पर्धेत आहेत. या दोघांकडून देशाला मोठ्या अपेक्षा आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या