Thursday, September 19, 2024
Homeक्रीडाParis Olympics 2024 : भारतीय हॉकी संघाची कांस्य पदकाची कमाई

Paris Olympics 2024 : भारतीय हॉकी संघाची कांस्य पदकाची कमाई

स्पेनवर 2-1 च्या फरकाने मात

पॅरिस | Paris

- Advertisement -

भारतीय हॉकी टीमने (India Hockey Team) स्पेनला पराभूत करत कांस्य पदकाची (Bronze Medal) कमाई केली आहे. भारताचा कॅप्टन हरमनप्रीत सिंह याच्या नेतृत्वात भारताने स्पेनवर 2-1 अशा फरकाने मात केली आहे. भारताला यंदाही फायनलमध्ये पोहचण्यात अपयश आले आहे.

भारत आणि स्पेन यांच्यामध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics 2024) कांस्य पदकासाठी (Bronze Medal) सामना पार पडला. भारताला उपांत्य फेरीत जर्मनीकडून पराभव स्वीकारावा लागल्यानेकांस्य पदाकासाठी स्पेन (Spain) विरोधात लढत द्यावी लागली होती. उपांत्य फेरीच्या लढतीत दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला. भारताचा कॅप्टन हरमनप्रीत सिंग (Captain Harmanpreet Singh) यानं केलेले दोन गोल आणि पीआर श्रीजेशच्या भक्कम बचावावर भारताने कांस्य पदकाची कमाई केली आहे. या विजयासह भारतीय हॉकी संघाने पीआर श्रीजेशच्या कारकिर्दीला अनोखा सलाम केला आहे. भारताने टोक्योनंतर (Tokyo) आता पॅरिसमध्ये ((Paris) सलग दुसर्‍यांदा ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळवले आहे.

भारत आणि स्पेन यांच्यातील कांस्य पदकाची लढत रोमांचक झाली. भारत आणि स्पेन यांनी पहिल्या क्वार्टरमध्ये दमदार खेळ केला. यामुळे दोन्ही संघांना गोल करता आला नाही. भारताविरुद्ध दुसर्‍या क्वार्टरमध्ये स्पेनने पेनल्टी स्ट्रोकचा लाभ उठवत गोल केला. स्पेनसाठी हा गोल मार्क मिरालेस याने केला.

भारताचा ‘कमबॅक’
स्पेननं आघाडी घेतल्यानंतर भारताने जोरदार कमबॅक केले. भारताचा कॅप्टन हरमनप्रीत सिंगनं पेनल्टी कॉर्नरवर गोल करत 1-1 अशी बरोबरी केली. पहिला हाफ संपेपर्यंत भारतीय संघाने आक्रमक खेळ करत मॅचमध्ये बरोबरी साधली होती.
हरमनप्रीत सिंगनं भारतासाठी पहिला गोल 30 व्या मिनिटाला केला होता. तर, दुसरा गोल हरमनप्रीत सिंगनं 33 व्या मिनिटाला केला. यामुळं भारताने मॅचमध्ये 2-1 अशी आघाडी घेतली. भारताने यापूर्वी स्पेन विरोधात झालेल्या दोन्ही मॅच जिंकल्या होत्या. भारताने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये जर्मनीला पराभूत करत कांस्य पदकावर नाव कोरले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या