Thursday, January 8, 2026
Homeक्रीडाManu Bhaker : दोन पदकांसह मनू भाकर भारतात परतली, ढोल ताशांच्या गजरात...

Manu Bhaker : दोन पदकांसह मनू भाकर भारतात परतली, ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत

दिल्ली । Delhi

पॅरिस ऑलिम्पिक म्हटलं की आता मनू भाकरचं नाव घेतलं जाणार आहे. वयाच्या अवघ्या २२ वर्षी मनू भाकरने इतिहास रचला आहे. मनू भाकरने भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकले असून अशी कामगिरी ती पहिली खेळाडू ठरली आहे.

- Advertisement -

मनू भाकर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं पटकावून मायदेशी परतली. नवी दिल्लीत विमानतळावर तिचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी मनू भाकरसोबत तिचे प्रशिक्षक जसपाल राणा हेसुद्धा होते. विमानतळावर चाहत्यांनी तिचे हार घालून स्वागत केले. यावेळी ढोल ताशेही वाजवले.

YouTube video player

मनू भाकरने दिल्ली विमानतळावर झालेल्या स्वागताबद्दल भारतीय पाठिराख्यांचे आभार मानले. तिने सोशल मीडियावर म्हटलं की, मला जो पाठिंबा आणि शुभेच्छा मिळत आहेत त्यामुळे मी खूपच भावुक झाले. मी जे स्वप्न नेहमी पाहिलं तसंच आहे हे. देशासाठी जगातील सर्वात मोठ्या व्यासपीठावर केलेल्या या कामगिरीचा अभिमान असल्याचंही मनू भाकरने म्हटलं.

मनू भाकरने अंतिम सामन्यात चमकदार कामगिरी केली, पण त्याची एक चूक त्याला महागात पडली. शूट-ऑफ टायब्रेकरनंतर चौथ्या स्थानावर राहिल्यानंतर मनू भाकरला एलिमिनेशनचा सामना करावा लागला. मनू भाकेरला या फेरीत ५ शॉट्स घ्यावे लागले. मनू भाकरला या ५ पैकी केवळ ३ शॉट मारता आले आणि तिचा स्कोअर १०.२ होता. तर, चौथ्या स्थानावर असलेल्या वेरोनिकाने लक्ष्यावर ४ शॉट्स मारले. यामुळे मनू भाकरचे स्वप्न भंगले आणि तिला अवघ्या १ शॉट चुकल्याने तिसरे पदक जिंकता आले नाही.

ताज्या बातम्या

टॅरिफ

रशियावर ५०० टक्के टॅरिफ लादणाऱ्या विधेयकाला अमेरिकेत मंजुरी; भारतावरही ‘इतके’ टक्के...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रशियावर ५०० टक्के आयातशुल्क (टॅरिफ) लादण्याच्या तयारीत आहेत. या संदर्भातील विधेयक पुढील आठवड्यात संमत होण्याची...