Monday, October 21, 2024
HomeराजकीयParivartan Mahashakti Aghadi : 'परिवर्तन महाशक्ती'ची पहिली यादी जाहीर!

Parivartan Mahashakti Aghadi : ‘परिवर्तन महाशक्ती’ची पहिली यादी जाहीर!

मुंबई | Mumbai

विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Elections 2024) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

- Advertisement -

एकीकडे महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीत (Mahayuti) सामना रंगणार असून तर दुसरीकडे प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी परिवर्तन महाशक्ती आघाडीच्या माध्यमातून वेगळी चूल मांडल्याचे चित्र आहे. याच दरम्यान परिवर्तन महाशक्ती आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे

छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) (प्रमुख, महाराष्ट्र स्वराज्य पक्ष), बच्चू कडू (अध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष) आणि राजू शेट्टी (संस्थापक, स्वाभिमानी शेतकरी संघटना) यांनी एकत्र पत्रकार परिषद घेत परिवर्तन महाशक्तीच्या १० उमेदवारांची घोषणा केली आहे. या दहा उमेदवारांमध्ये बच्चू कडू (Bachu Kadu) यांच्या नावाचा देखील समावेश आहे. त्यांना अचलपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे.

अनिल चौधरी यांना रावेरमधून संधी देण्यात आली आहे. तर गणेश निबाळकर यांना चांदवड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच वामनराव चटप यांना राजुरा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे तर अंकुश कदम यांना ऐरोली आणि सुभाष साबणे यांना देंगलुर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

तसेच गोविंदराव भवर यांना हिंगोली विधानसभा मतरदारसंघातून आणि माधव देवसरकर यांना हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तर शिरोळ, मिरज या दोन मतदारसंघात स्वाभिमानी उमेदवार उद्या जाहीर करेल अशी माहिती राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी दिली. यावेळी बारामतीमध्ये देखील परिवर्तन महाशक्ती उमेदवार देणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनाचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिली. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात परिवर्तन महाशक्ती कोणता उमेदवार उतरवणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या