Tuesday, March 25, 2025
Homeदेश विदेशParliament Winter Session: संसद परिसरात सत्ताधारी-विरोधकांमध्ये धक्काबुक्कीचा प्रकार; भाजप खासदार सारंगी जखमी

Parliament Winter Session: संसद परिसरात सत्ताधारी-विरोधकांमध्ये धक्काबुक्कीचा प्रकार; भाजप खासदार सारंगी जखमी

काँग्रेस खासदार राहुल गांधींनी आंदोलनादरम्यान धक्का दिल्याचा भाजप खासदाराचा दावा

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर संसद परिसरात सत्ताधारी-विरोधकांमध्ये मोठा गदारोळ चालू आहे. यामध्ये भाजपाचे खासदार प्रताप चंद्र सारंगी जखमी झाले असून, त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या खासदारांनी रान उठवले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजप खासदारांना काँग्रेसवरच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याचा ठपका ठेवत गुरुवारी संसदेत निषेध आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान, भाजपा खासदार प्रताप सारंगी हे खाली पडल्याने जखमी झाले आहेत. राहुल गांधींनी धक्का दिल्याचा आरोप सारंगी यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.

नव्या संसदेच्या मकर द्वाराच्या परिसरात हा धक्काबुकीचा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. प्रताप चंद्र सारंगी जखमी झाल्यानंतर भाजपच्या काही खासदारांनी मल्लिकार्जून खरगे आणि प्रियांका गांधी यांनाही धक्काबुक्की केल्याचे समजते.

- Advertisement -

काय म्हणाले प्रताप चंद्र सारंगी?
राहुल गांधींनी एक खासदाराला माझ्या अंगावर ढकलले, त्यामुळे मी खाली पडलो आणि जखमी झालो. मी पायऱ्यांवर उभा होतो. त्यावेळी राहुल गांधींनी धक्का दिलेला खासदार माझ्या अंगावर पडला, असा सारंगी यांचा दावा आहे. दरम्यान, प्रताप सारंगी यांना या प्रकारानंतर तातडीने एअर अॅम्ब्युलन्सने रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रताप सारंगी यांच्या डोक्याला जखम झाली आहे. त्यांच्यावर सध्या दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर भाजप खासदार मुकेश राजपूत यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर पीयूष गोयल , धर्मेंद्र प्रधान , शिवराज सिंह चौहान आणि प्रल्हाद जोशी इस्पितळात पोहचले आहेत.

राहुल गांधी आरोपांवर काय म्हणाले?
या सगळ्या घटनेनंतर राहुल गांधी यांनी आपली बाजू मांडताना म्हटले की, मी संसदेच्या प्रवेशद्वारातून आत जाण्याचा प्रयत्न करत होतो. त्यावेळी भाजप खासदार मला रोखण्याचा प्रयत्न करत होते. ते मला धमकावत होते, त्यावेळी हा प्रकार घडला. मला संसदेत जाण्याचा अधिकार आहे. भाजप संविधानावर आक्रमण करत आहे, हा मूळ मुद्दा आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले.

अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्यावर विरोधक आक्रमक झाले आहेत. आज विरोधी पक्षांनी संसदेतील आंबेडकर पुतळ्यापासून मकरद्वारपर्यंत निषेध मोर्चा काढला. इंडिया ब्लॉकचे खासदार निळे कपडे परिधान करून आंबेडकर पुतळ्यापासून मकरद्वारपर्यंत चालत जाण्याचा प्रयत्न करत होते. अमित शहा यांनी आंबेडकरांचा अपमान केला असून त्यांना पंतप्रधान मोदी यांनी मंत्रिमंडळातून हटवावे, अशी मागणी विरोधकांनी केली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...