पारनेर । तालुका प्रतिनिधी
मागील महिन्यात पारनेर व शेवगाव तालुक्यांत बनावट एटीएम कार्डचा (ATM Card) वापर करून फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींना पारनेर पोलिसांनी गजाआड केले आहे.
याप्रकरणी अमोल भगवान शेंडे (वय ३५ वर्षे, रा. काटी. ता. इंदापूर) व मल्हारी दत्तात्रय शेंडगे (वय ३४, वनगळी, ता. इंदापूर) या दोघांना पारनेर पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून ३१ हजार ७३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हे ही वाचा : हवाई सुंदरी ते अभिनेत्री! ‘असा’ आहे प्रतिक्षा होन्मुखेचा फिल्मी प्रवास
या दोन्ही आरोपींनी शेवगावात बनावट एटीएम कार्डच्या माध्यमातून ७९ हजार रुपयांची फसवणूक केली असल्याची कबुली दिली आहे. दोन्ही आरोपींनी फिर्यादीला पैसे काढता येत नाही काय, असे म्हणून एटीएम कार्ड घेऊन व नजर चुकवून हातचलाखीने कार्ड बदलून फसवणूक केली.
पारनेर पोलिसांनी या दोन्ही आरोपीकडून तीस हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन व रोख रक्कम हस्तगत केली आहे. पारनेर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक समिर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो हँ का शामसुंदर गुजर पुढील तपास करत आहेत .
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा