Wednesday, October 23, 2024
HomeनगरFarmers News : संततधार पावसाने पिके आली धोक्यात, बळीराजा हवालदिल

Farmers News : संततधार पावसाने पिके आली धोक्यात, बळीराजा हवालदिल

पारनेर | तालुका प्रतिनिधी

पारनेर (Parner) तालुक्यात काही दिवसाच्या विश्रांतीनंतर गेल्या दोन दिवसापासून पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून विविध भागात पावसाने जोरदार (Heavy Rain) हजेरी लावली आहे.

- Advertisement -

या संततधार पावसामुळं रोगराईमुळे तालुक्यातील शेतीचे (agriculture) मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्याच्या हातात तोंडाला आलेले मुगाचे पीकही धोक्यात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

यावर्षीच्या पहिल्या हंगामात पावसाने जोरदार सुरुवात केल्याने तालुक्यात वटाण्याची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली. मात्र संततधार पाऊस व ढगाळ वातावरण यामुळे वटाण्याचे नुकसान झाले. शेतकऱ्यांनी यासाठी लावलेले भांडवल ही परत आले नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला.

हे हि वाचा : Badlapur Girls Assault : “लाडक्या बहिणींच्या छोट्या मुलीही….”; बदलापूर प्रकरणावरुन उद्धव ठाकरेंचा संताप

त्यातच गेल्या आठवड्यात पावसाने उघडीक दिली. परंतु दोन दिवसापासून पुन्हा पाऊस सक्रिय झाल्याने हातात तोंडाला आलेले मुगाचे पीकही वाया जाण्याची शक्यता आहे. अनेक शेतकरी पाऊस असूनही मुग तोडणी करत आहेत. तोडणीला उशीर झाल्यास मुगाला मोड येण्याची शक्यता असून भरमसाठ रोजंदारी खर्च करून मुगाची तोडणी करण्यात शेतकरी व्यस्त आहेत.

तसेच भाजीपाला सोयाबीन, बाजरी, वाल, टोमॅटो, कोबी, झेंडूचे कांदा रोपे आधी पिके सततच्या पाऊस व ढगाळ वातावरणामुळे धोक्यात आली आहेत .

हे हि वाचा : Gautami Patil : गौतमी पाटीलला दिलासा! अटी-शर्तींनुसार जामीन मंजूर, नेमकं प्रकरण…

तालुक्यात फळबागा ही मोठ्या प्रमाणात आहेत यामध्ये संत्रा डाळिंब सिताफळ पेरू आधी फळबागा असून ढगाळ वातावरण व संततधार पाऊस याचा परिणाम फळबागावर झाल्याचा दिसून येत असून रोगराईचे प्रमाण वाढले आहे.

वातावरणात झालेल्या बदलामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्यांनी भेडसावले असून साथीच्या रोगांनी डोके वर काढले आहे तालुक्यातील विविध हॉस्पिटलमध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे.

हे हि वाचा : कोलकाता अत्याचार प्रकरण! डॉक्टरांच्या सुरक्षिततेवर सुप्रीम कोर्टाचा सर्वात मोठा निर्णय

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या