पारनेर । तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सुरु करण्याची घोषणा केली आहे. यात महिलासाठी आँनलाईन पद्धतीने सविस्तर माहितीसह आर्ज दाखल केला तर दरमहा पंधराशे रुपये त्या महिलेच्या बँक खात्यावर जमा केले जाणार आहेत अशी घोषणा केली.
या घोषणेने महिला वर्गात मोठा उत्साह जाणवत होता परंतु गेल्या दोन तीनआठवड्यापासुन या योजनेचे सर्व्हर चालत नसल्याने विविध कागदपञासह भरलेली माहिती पुढे जात नसल्याने लाडक्या बहिणी थोड्या हिरमुसलेल्या दिसत आहेत.
लाडक्या बहिण योजनेचा आर्ज भरण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘नारी शक्ती दुत’ म्हणून मोबाईल अँप विकसित केले आहे. राज्यभरातुन एकाच वेळी लाखो अर्ज जाऊ लागल्याने त्या अँपवर लोड आल्याने हे अँप चालत नाही. पर्यायाने महिलाचे आर्ज पुढे दाखल होत नाही.
हे देखील वाचा : “बळीराजाला सुखी ठेव, कष्टकऱ्यांच्या व सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे…”; मुख्यमंत्र्यांनी घातले पांडुरंगाच्या चरणी साकडे
पंधराशे रुपये मिळतील या आशेने सुरवातीला महिलांनी उत्पनाचा दाखला, रहिवाशी पुरावा दाखला (डोमासाईल) मिळवण्यासाठी धावपळ केली. कालांतराने मुख्यमंत्र्यानी अनेक अटी शिथील केल्या असल्या तरी अर्ज पुढे दाखल होत नसल्याने मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणींना अजून प्रतिक्षा करावी लागणार आहे .
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी शासनाने सध्या मोबाईल अँप लाँच केले आहे. तर लवकरच संगणकाची लिंक येईल असे सांगितले जात आहे. जर शासनाने आर्ज दाखल करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध केले तर गर्दी विभागली जाऊन अर्ज दाखल होतील अशी अपेक्षा नागरिकांना व लाडक्या बहिणींना लागली आहे. सध्या तरी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या बहिणींना प्रतिक्षा करावी लागत आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा