Wednesday, February 4, 2026
Homeनगरपारनेरचे तिघे अधिकारी ‘लाचलुचपत’ च्या जाळ्यात

पारनेरचे तिघे अधिकारी ‘लाचलुचपत’ च्या जाळ्यात

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

पंचायत समिती पारनेर येथील रोजगार हमी बांधकाम व जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत असलेल्या तिघा अधिकार्‍यांवर 65 हजार 600 रूपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. त्यांच्याविरूध्द येथील तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरूवारी (20 नोव्हेंबर) ही कारवाई करण्यात आली.

- Advertisement -

रोजगार हमी बांधकामचे पॅनल तांत्रिक अधिकारी विलास नवनाथ चौधरी (31), कृषी विभागातील तांत्रिक सहाय्यक दिनकर दत्तात्रय मगर (27) व उपअभियंता, जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम उपविभाग, श्रीगोंदा (अतिरिक्त कार्यभार- सार्वजनिक बांधकाम उपविभाग, पारनेर) अजय विठ्ठल जगदाळे अशी त्या तिघा अधिकार्‍यांची नावे आहेत.

YouTube video player

तक्रारदार यांच्या नातेवाईकांची एक कंत्राटी फर्म असून, मातोश्री ग्राम समृध्दी पाणंद रस्ते योजना अंतर्गत मौजे कारेगाव ते वाघोबा रस्ता खडीकरण व मजबुतीकरणाचे काम मिळाले होते. या कामाचे मोजमाप करणे, बिले तयार करणे व ती मंजुरीसाठी पाठवणे याचे काम संशयित तिघा आरोपींच्या जबाबदारीत होते. याबाबत पॅनल तांत्रिक अधिकारी विलास चौधरी याने स्वतःसाठी तसेच उपअभियंता अजय जगदाळे, तांत्रिक सहाय्यक दिनकर मगर आणि इतरांसाठी मिळून 65 हजार 600 रूपयांची लाचेची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत विभागाकडे केली होती.

18 नोव्हेंबर रोजी पंचासमक्ष पडताळणी दरम्यान चौधरी यांने तक्रारदाराकडे कामाच्या प्रक्रियेसाठी त्याच रकमेची मागणी करत लाच घेण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार गुरूवारी पंचायत समिती, पारनेर येथे जाळा टाकण्यात आला. त्यावेळी चौधरी याने स्वतः व अजय जगदाळे याच्या वतीने दिनकर मगर याच्यामार्फत पंचासमक्ष 65 हजार 600 रूपये लाच स्वीकारली.

पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजू आल्हाट, अंमलदार संतोष शिंदे, रवींद्र निमसे, बाबासाहेब कराड, हारूण शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली.

ताज्या बातम्या

Nashik News : पाणी व स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन रखडले;...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ व जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषद (Zilla Parishad) स्तरावर कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर...