Monday, May 27, 2024
Homeनगरशेतातील झाडाला गळफास घेत तरुणाची आत्महत्या

शेतातील झाडाला गळफास घेत तरुणाची आत्महत्या

पारनेर | तालुका प्रतिनिधी

शेतातील झाडाला गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील पिंपरी गवळी येथे शनिवारी उघडकीस आली. गणेश बाळासाहेब चहाळ (वय 36) असे तरुण युवकाचे नाव आहे.

- Advertisement -

याबाबत दत्ताञ्य बाळासाहेब चहाळ यांनी सुपा पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आमचे बंधू गणेश बाळासाहेब चहाळ यांनी शनिवार (दि 2) रोजी सकाळी सात वाजण्याच्या अगोदर आमच्या शेतातील लिंबाच्या झाडाला केबलच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. कुटुंबीयांनी ताबडतोब त्यास पारनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु तेथे त्यास मृत घोषीत केले.

Maratha Andolan : मराठा आंदोलनाचा भडका! सरपंचाने जाळली स्वत:ची कार, ‘एक मराठा, लाख मराठा’च्या दिल्या घोषणा

घटनेची माहिती कळताच सुपा पोलिस स्टेशनचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनेची माहिती घेत पंचनामे केले व दत्ताञ्य चहाळ यांच्या फिर्यादीवरुन अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. आत्महत्येचे अद्याप समोर आले नसून सुपा पोलिस स्टेशनच्या पोलिस निरिक्षक श्रीमती ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोसइ पठाण पुढील तपास करत आहेत .

मनमाड रस्त्यावर लुटमार करणारी राहुरीची टोळी गजाआड

- Advertisment -

ताज्या बातम्या