Friday, May 24, 2024
Homeनाशिकजिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेशासाठी पास गरजेचा

जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेशासाठी पास गरजेचा

नाशिक । Nashik

जिल्हाधिकारी कार्यालयात रोज कामानिमित्त अभ्यंगतांच्या होणार्‍या गर्दीमुळे करोना संसर्गाचा धोका वाढला अाहे. ते बघता यापुढे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेशासाठी पास बंधनकारक ठरणार आहे. पास नसला तर जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश मिळणार नाही. तसेच यापुढे निवेदन देण्यासाठी एकाच व्यक्तिला परवानगी दिली जाईल, असा महत्वपूर्णनिर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातच करोनाचा शिरकाव झाला तर सर्व यंत्रणाच विस्कळित होण्याचा धोका नाकरता येत नाही.

- Advertisement -

शहर व जिल्ह्याला करोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत असून रुग्णांची संख्या ७ हजारांच्या पलीकडे गेली आहे. शहरात तर दिवसाला शंभर ते दीडशे रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे करोनाला अटकाव घालण्यासाठी युध्दपातळिवर प्रयत्न सुरु आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय या लढाईचे वाॅर रुम बनले आहे. सर्व महत्वाच्या बैठका व नियोजन हे जिल्हाधिकारी कार्यालयात ठरते. तेथून आदेश निर्गमित होऊन जिल्हाभर त्यांची अंमलबजावणी होते. तसेच दिवसभर विविध कामकाजासाठी सर्वसामान्य नागरिक देखील जिल्हाधिकारी कार्यालयात येतात.

राजकीय पक्षाचे नेते व पदाधिकारी आंदोलन करुन जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देतात. ते बघता या ठिकाणी करोनाचा संसर्ग होण्याची मोठी भिती आहे. त्यासाठी महिनाभरापासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आतील प्रवेश जिन्याजवळ येणार्‍या अभ्यंगतांचि थर्मल स्कॅनिंग करुन व त्यांचे नाव नोंदणी करुनच प्रवेश दिला जात आहे. तसेच प्रत्येकाने हात सॅनेटाईज केल्यानंयरच प्रवेश दिला जातो. पण आता करोनाचा धोका आणखी वाढला असून तो जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहचला आहे.

तेथे जर करोनाचा शिरकाव झाला तर मग सर्व यंत्रणाच कोलमडून जाईल. हा धोका लक्षात घेता जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेशाबाबत आणखी कडक नियम करण्यात आले आहे. यापुढे जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्यासाठी प्रत्येकाला पास घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. मुख्य प्रवेशद्वार पूर्णपणे बंद करुन साखळीचे बरिकेड उभारण्यात आले आहे.

प्रवेशद्वारावर दोन जनसंपर्क विभाग तयार करण्यात आले असून कागदपत्रे तेथेच स्विकारले जातील. राजकिय पक्षांचे निवेदन असेल तर दोनच व्यक्तींना जनसंपर्क कक्षाद्वारे प्रवेश दिला जाईल. अती महत्वाचे काम असेल तरच पास, कक्षात रोटेशन नुसार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या