Thursday, January 8, 2026
Homeब्रेकिंग न्यूजPlane Crash : प्रवासी विमान कोसळलं, ६२ जणांचा मृत्यू… अंगावर काटा आणणारा...

Plane Crash : प्रवासी विमान कोसळलं, ६२ जणांचा मृत्यू… अंगावर काटा आणणारा VIDEO समोर

दिल्ली । Delhi

गेल्या काही दिवसांमध्ये विमान कोसळण्याचा (Plane Crash) दुर्घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. नेपाळमध्ये विमान (Nepal Plane Crash)अपघाताची घटना ताजी असताना आता ब्राझीलमध्ये (Brazil Plane Crash) शुक्रवारी मोठा विमान अपघात झाला आहे. या विमानात ५८ प्रवासी आणि ४ कर्मचारी होते.

- Advertisement -

या अपघातात विमानातील सगळ्या प्रवाशांना मृत्यू झाल्याची माहिती ब्राझीलचे अध्यक्ष लूला डी सिल्वा यांना दिली. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन अपघाताबद्दल दु:ख व्यक्त करत नागरिकांना एक मिनिटाचं मौन राखून मृतांना श्रद्धांजली वाहण्याचं आवाहन केलं आहे. या दुर्घटनेचे काही व्हिडीओ समोर आले असून जमिनीवर कोसळल्यानंतर या विमानाचा स्फोट झाल्याचं या व्हिडीओंमध्ये दिसत आहे. (plane crash in Brazil)

YouTube video player

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार दुर्घटनाग्रस्त विमान ब्राझीलमधीलच साओ पावलोज येथील ग्वारुलोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणार होतं. या विमानात एकूण ५८ प्रवासी आणि ४ कर्मचारी होते. दुर्घटनाग्रस्त विमानाचे नाव एटीआर-२७ असून ते व्होपास लिहॉन्स एरियाज या एअरलाईन्सचे होते. मिळालेल्या माहितीनुसार नागरी वस्तीत हे विमान क्रॅश झाले असून जमिनीवर येताना ते अनेक घरांना धडकले. त्यामुळे या दुर्घटनेत आणखी जीवित आणि वित्तहानी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Brazil plan crash video)

अपघाताचं कारण काय?

दुपारी १.३० च्या सुमारास विमानातील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. त्यानंतर विमानाचा विमानतळाशी असलेला संपर्क तुटला. काही वेळाने थेट विमान कोसळल्याची माहिती मिळाली. विमान नेमकं कशामुळे कोसळलं, विमानात आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेलं नाही. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की ज्या ठिकाणी विमान कोसळलं तिथून आगीचे मोठे लोळ दिसत होते. विमान कोसळल्यानंतर एका मोठ्या स्फोटाचा आवाजही आला होता.

ताज्या बातम्या

टॅरिफ

रशियावर ५०० टक्के टॅरिफ लादणाऱ्या विधेयकाला अमेरिकेत मंजुरी; भारतावरही ‘इतके’ टक्के...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रशियावर ५०० टक्के आयातशुल्क (टॅरिफ) लादण्याच्या तयारीत आहेत. या संदर्भातील विधेयक पुढील आठवड्यात संमत होण्याची...