सार्वमत
नवी दिल्ली – पतंजलीचे औषध दिल्यानंतर करोनाचे रुग्ण 5 ते 14 दिवसात ठणठणीत झाले असा दावा आचार्य बालकृष्ण यांनी केला आहे. करोना या रोगाचा इलाज आर्युर्वेदिक औषधामुळे शक्य आहे.
- Advertisement -
आमचं औषध घेणार्या 70 टक्के लोकांचा करोना हा अवघ्या पाच दिवसांमध्ये बरा झाला. इतकंच नाही तर जे पेशंट करोना पॉझिटिव्ह झाले होते ते आमच्या औषधानंतर निगेटिव्ह झाले असाही दावा बालकृष्ण यांनी केला आहे.
आम्ही औषध शोधल्याचा दावा करतो आहोत तर आमच्याकडे पुरावे मागितले जाणार हे उघड आहे. आम्ही पुढच्या पाच दिवसांमध्ये याबाबतचे सगळे पुरावे देत आहोत असंही बालकृष्ण यांनी सांगितलं. तसंच आम्ही क्लिनिकल ट्रायल्सही करतो आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलं.