Thursday, March 27, 2025
Homeनगरवाहनाच्या धडकेत पती ठार तर पत्नी गंभीर जखमी

वाहनाच्या धडकेत पती ठार तर पत्नी गंभीर जखमी

पाथर्डी-नगर रस्त्यावरील घटना

पाथर्डी |प्रतिनिधी| Pathardi

खडी वाहणार्‍या विना क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने (Vehicle) एका दुचाकीला दिलेल्या धडकेत (Hit) पती ठार (Death) तर पत्नी गंभीर जखमी (Injured) झाले आहे. ही घटना पाथर्डी-नगर रोडवर (Pathardi Nagar Road) असलेल्या हॉटेल प्रशांत समोर गुरूवार (दि. 11) रोजी घडली असून या घटनेत नितीन संजय पवार (वय 27 रा.वाघोली ता.शेवगाव) या तरुणाचा मृत्यू (Death) झाला. तर त्याची पत्नी रेणुका पवार (वय 24) ही गंभीर जखमी झाली असून तिला पुढील उपचारासाठी नगरला हलवण्यात आले आहे.

- Advertisement -

पवार दाम्पंत्य हे आपल्या दुचाकीवरून पाथर्डीकडून (Pathardi) नगर रोडने जात असतांना समोरून आलेल्या चारचाकी वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. यात नितीन पवार यांचा जागीच मृत्यू (Death) झाला तर रेणुका पवार या गंभीर जखमी झाल्या. अपघात झाल्यानंतर वाहन सुद्धा रस्त्याच्या बाजूला पलटी झाले. ज्या ठिकाणी हा अपघात (Accident) झाला तो रस्ता अत्यंत वर्दळीचा असल्याने घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाली होती. नागरिकांनी जखमींना पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले होते. मात्र उपचारापूर्वीच नितीन पवार हे मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. घटनेनंतर चारचाकी वाहनाचा चालक पसार झाला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Uddhav Thackeray: “ही सौगात ए मोदी नाही तर सौगात ए सत्ता”;...

0
मुंबई | Mumbaiगेले चार आठवडे सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे बुधवारी (२६ मार्च) सूप वाजले. या अधिवेशनात १० मार्च रोजी राज्याचा सन २०२५-२६...