Saturday, July 27, 2024
Homeनगरदौंड यांच्या वक्तव्याने पाथर्डी तालुक्यात राजकीय खळबळ

दौंड यांच्या वक्तव्याने पाथर्डी तालुक्यात राजकीय खळबळ

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ दौंड यांनी राजळे व ढाकणे घराण्यावर केलेल्या टीकेमुळे राष्ट्रवादी (शरद पवार गट) व भाजपा यांच्यात अस्वस्थता निर्माण झाली आहे. दौंड यांच्या विधानाशी आम्ही सहमत नसल्याचे कार्यक्रमास उपस्थित असलेल्या भाजपच्या स्थानिक नेत्यांनी पत्रक काढुन खुलासे जाहीर केले आहेत. तर दुसरीकडे अ‍ॅड. ढाकणे समर्थकांनी दौंड यांना मतदारसंघाचा नकाशा तरी माहीत आहे का असा प्रश्न विचारून दौंड यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.

- Advertisement -

भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ दौंड यांनी वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात मगेली सत्तर वर्ष ढाकणे व राजळे या दोन घराण्याच्या हातात सत्ता असतानाही तालुक्याचा विकास का झाला नाही? असा प्रश्न उपस्थित करून तालुक्याचा विकास करायचा असेल तर सामान्य माणसाला आमदार करा असे जाहीर अवाहन केले. याद्वारे त्यांनी आगामी विधानसभेला आपण दावेदार असल्याचे संकेत दिले होते.

यावेळी व्यासपीठावर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, डॉ. मृत्युंजय गर्जे, भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल गर्जे यांच्यासह भाजपचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी एक प्रसिद्धिपत्रक प्रसिध्दीस देत दौंड यांच्या कार्यक्रमाला आम्ही मित्रत्वाच्या नात्याने उपस्थित होतो. आम्ही त्यांच्या मतशाी सहमत नसल्याचे म्हटले आहे. तर राष्ट्रवादीचे ( शरद पवार गट ) तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, बंडू पाटील बोरुडे, सीताराम बोरुडे, योगेश रासने, देवा पवार, संपत गायकवाड, चंद्रकांत भापकर, रत्नमाला उदमले यांनी एका प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध केले आहे.

यात म्हटले आहे की, दौंड यांनी केलेले वक्तव्य बालिशपणाचे आहे. त्यांनी आपली योग्यता तपासायला हवी. त्यांचा जन्म झाला नव्हता तेव्हा बबनराव ढाकणे यांनी तालुक्यात वीज आणली आणली असून केदारेश्वर कारखाना उभा केला आहे. तसेच अप्पासाहेब राजळे यांनी वृद्धेश्वर कारखान्याची स्थापना केली आहे. गोवा मुक्ती संग्रामासाठी योगदान दिले बबनराव ढाकणे यांनी शेवगांव पाथर्डी तालुक्यात त्याकाळी अनेक बंधारे बांधले, ऊसतोड मजूरांसाठी कामगारा संघटना उभी केली त्या मधुन एक लवाद शासकीय तयार झाला. त्यानंतर तोडणी कामगारांना न्याय मिळत गेला. काही पण बेछुट आरोप करण थांबवा तुमची तेवढी योग्यता नाही अन्यथा उद्याची राजकीय परीस्थिती वेगळी निर्माण होइल त्याला कारणीभूत आपण राहताल असेही पत्रकात म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या