Wednesday, January 7, 2026
Homeक्राईमPathardi : पाथर्डीत चार दुकाने फोडली; पोलिसांवरही प्रश्नचिन्ह

Pathardi : पाथर्डीत चार दुकाने फोडली; पोलिसांवरही प्रश्नचिन्ह

भर चौकात झालेल्या चोर्‍यांमुळे भीती

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

पाथर्डी शहरात बुधवारी पहाटे दोन ठिकाणी चोर्‍या आणि दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना घडली. शहरातील अत्यंत गजबजलेल्या कोरडगाव रोड व कोरडगाव चौक परिसरात चोरट्यांनी दुकाने फोडून रोख रक्कम व साहित्याची चोरी केली. भर चौकात घडलेल्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

- Advertisement -

कोरडगाव रोडवरील नवकार ट्रेडर्स हे सुशिल लुणावत यांचे किराणा दुकान चोरट्याने शटर वाकवून फोडले. दुकानातील अंदाजे दहा ते पंधरा हजार रुपयांची रोख रक्कम लंपास करण्यात आली आहे. घटनेनंतर भीतीचे सावट निर्माण झाले असून रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. याच दरम्यान, कोरडगाव चौकातील गजराज इलेक्ट्रिक हे मंत्री यांचे दुकान देखील चोरट्यांनी फोडले.

YouTube video player

दुकान मालक जयकिसन मंत्री हे परगावी असल्याने किती मुद्देमाल व रोख रक्कम चोरी गेली याचा तपशील तात्काळ मिळू शकला नाही. दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा जवळील सचिन भंडारी यांचे जनरल स्टोअर्स आणि सोमनाथ रोडी यांचे चहाचे दुकानाचा दरवाज्या उचकटण्याचा प्रयत्न झाला. मात्र चोरट्यांचा हा प्रयत्न फसला असून कोणताही मुद्देमाल चोरीला गेला नाही.

दोन चोरटे सीसीटीव्हीत कैद
नवकार ट्रेडर्स दुकान फोडताना दोन चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात स्पष्टपणे कैद झाले असून त्यावरून चोरट्यांचा शोध घेण्यास पोलिसांना मदत होणार आहे. विशेष म्हणजे या सर्व घटनांबाबत पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नव्हती. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी पहाटेच्या वेळी सलग दुकाने फोडली जात असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी तात्काळ बंदोबस्त वाढवून चोरट्यांचा शोध लावावा, अशी मागणी होत आहे.

ताज्या बातम्या

Imtiaz Jaleel : छत्रपती संभाजीनगरचे वातावरण तापले! इम्तियाज जलील यांच्या गाडीवर...

0
छत्रपती संभाजीनगर । Chhatrapati Sambhajinagar महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडाला असतानाच शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एमआयएमचे (MIM) प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज...