Monday, May 20, 2024
Homeजळगावपावणे सहा लाखांची मुदतबाह्य किटक नाशके जप्त

पावणे सहा लाखांची मुदतबाह्य किटक नाशके जप्त

भुसावळ Bhusawal । प्रतिनिधी

तालुक्यातील पिंपळगाव (Pimpalgaon) येथे कृषि केंद्राचा (Agricultural Centre) परवाना (Without a license) नसतांना मुदतबाह्य किटकनाशकांचा (Expired pesticides) साठा 5 लाख 87 हजार 495 रुपयांचा मुद्देमाल जप्त (Confiscation of goods) करण्याची कारवाई (action) 7 रोजी कृषि विभागाच्या गुणवत्ता पथकाने (Quality Team of Agriculture Department) केली. या कारवाईने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यतील पिंपळगाव बु. येथिल रहिवासी नितीनचंद बन्सीलाल जैन यांच्याकडे कृषि केंद्राचा कुठलाही परवाना नसतांना विनापरवाना तसेच मुदतबाह्य कीटकनाशकांचा साठा करुन विक्री करत होता. याबाबत गुप्त माहितीच्या आधारे कृषि विभागाच्या गुणवत्ता पथकाने जैन याच्या सर्वे नंबर 239 घर क्रमांक 744 व 745 या ठिकाणी छापा मारला असता विनापरवाना, मुदतबाह्य कीटकनाशकांचा साठा अनधिकृतपणे साठवणूक व विक्री करत असल्याचे आढळून आले. सदर प्रसंगी संशयित आरोपी नितीनचंद बन्सीलाल जैन यांच्याकडून 5 लाख 87 हजार 495 रुपयांचा मुद्देमाल जप्त करुनत्याचा पंचांसमक्ष पंचनामा करण्यात आला प्रसंगी वरणगावचे सपोनि आशिष अडसूळ व पोउनि परशुराम दळवी, पो. काँ. मनोहर पाटील, पो.ना. प्रशांत ठाकूर हे उपस्थित होते.

ही कारवाई कृषी सहसंचालक (नासिक विभाग) मोहन वाघ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर व कृषी विकास अधिकारी वैभव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा स्तरीय गुणवत्ता नियंत्रण पथकातील मोहिम अधिकारी जिल्हा परिषद जळगावचे विजय दगु पवार, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे, तालुका कृषि अधिकारी अभिनव माळी,पं.स.चे गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक धीरज बडे, विस्तार अधिकारी कपिल सुरवाडे यांच्या संयुक्त पथकाने केली.

याबाबत वरणगाव पोलिसात नितीनंद जैन याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई वरणगाव पोलीस करत आहे.

मुदतबाह्या किटक नाशकांचे दुष्परिणाम

दरम्यान, तालुक्यातील पिंपळगाव येथे मुदतबाह्या किटकनाशकांचा विनापरवाना तसेच कुठले ही बिल न देता विक्री सुरु होती. सदरच्या मुदतबाह्या किटक नाशकांमुळे पीकांवर आलेली फुलपाती गळणे, तसेच पिकांवर विपरित परिणाम होतात. किटक नाशकांची मुदत संपल्यामुळे त्यांची परिणामकारकता वाढते. त्याचा परिणाम किटक नाशकांची फवारणी करणार्‍या शेतकरी, मुजुराच्या स्वास्थावर होऊन परिणामी जीव ही गमवावा लागू शकतो. असा भयंकर प्रकार तालुक्यात सुरु होता. शेतकर्‍यांनीही विनापरवाना, मुदतबाह्या किटक नाशके न घेता अशा व्यक्तिंवर कारवाई करण्यासाठी पुढे येण्याच गरज आहे. किटकनाशके खरेदी करतांना संबंधित विक्रेत्याकडून शेतकर्‍यांनी बील घेणे ही गरजेचे आहे.

विनापरवाना, मुदतबाह्य व अवैध कीटकनाशकांची विक्री होत असल्याचे आढळून आल्यास त्यांच्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. शेतकर्‍यांची अशा पद्धतीने कोणीही फसवणूक करू नये. अशा प्रकाराकडे कृषी विभागाचे लक्ष असून भरारी पथकाच्या माध्यमातून कारवाई सुरू राहणार आहे.

-मोहन वाघ विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग,नाशिक.

- Advertisment -

ताज्या बातम्या