मुंबई । प्रतिनिधी Mumbai
एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा पूर्ण पगार मिळाला नसून पगाराची केवळ ५६ टक्के रक्कम मिळालेली आहे. यावरून काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी सरकारवर निशाणा साधत एसीत बसणाऱ्यांचे पगार देऊ नका, पण एसटी कर्मचाऱ्यांचे पगार द्या, अशी मागणी केली आहे.
- Advertisement -
सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी महामंडळाला नियमित पैसे देण्याचे आश्वासन दिले होते. पण स्वतःच्या फायद्यासाठी कितीही मोठी आश्वासने दिली तरी ती खोटीच असतात. कर्मचाऱ्यांनी काम शंभर टक्के करायचे पण पगार मात्र मिळणार ५६ टक्केच. एसटी कर्मचारी सरकारचा लाडका नाही का? महायुती सरकारचे विकासाचे चित्र किती फसवे आहे हे यावरून स्पष्ट होते, असेही वड्डेटीवार यांनी म्हटले आहे.