Monday, July 8, 2024
Homeब्रेकिंग न्यूजमोदींच्या गॅरंटीवर लोकांचा आता विश्वास नाही; शरद पवारांचे मोदींवर टीकास्र

मोदींच्या गॅरंटीवर लोकांचा आता विश्वास नाही; शरद पवारांचे मोदींवर टीकास्र

बारामती | Baramati
लोकसभा निवडणुक पार पडली आहे. या निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीच्या महायुतीपेक्षा जास्त जागा निवडून आल्या आहे. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार सध्या बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर आहे. ते तालुक्यातील विविध गावांचा दौरा करत आहे. गेल्या तीन दिवसात त्यांनी दुष्काळी गावांचा दौरा केला आहे. आज त्यांच्या दौऱ्याचा तिसरा दिवस असून या दुष्काळी दौऱ्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देणार आहे. या दौऱ्यादरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मोदी की गॅरेंटी या विधानावरुन टिका केली आहे.

- Advertisement -

काय म्हणाले शरद पवार?
महाराष्ट्रात आणि देशात असे दिसतेय की भाजप आणि मोदी सरकार यांच्याबद्दल लोकांच्या मनातील विश्वासाला तडा गेला आहे. मोदींच्या गॅरंटीवर लोकांचा आता विश्वास नाही, हे या लोकसभा निवडणुकीतून स्पष्ट झाले आहे. मोदींची गॅरंटी खोटी निघाली, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी टीकास्त्र सोडले. लोकसभा निवडणुकीतील निकालानंतर भाजपची महाराष्ट्रात मोठी पिछेहाट झाली आणि केंद्रातही स्वबळावर सत्ता मिळवता आलेली नसून एनडीएचे सरकार स्थापन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडूनही सरकारचे कान टोचण्यात आले होते.

राज्यात सुरू असलेल्या ओबीसी- मराठा बांधवाच्या संघर्षावरुनही शरद पवार यांनी महत्वाचे विधान केले. “केंद्र सरकारने यात पुढाकार घेतला पाहिजे. काही ठिकाणी कायद्यात बदल करायला लागेल, केंद्राला बघ्याची भूमिका घेतली जाणार नाही सामाजिक तणाव निर्माण होणार नाही याची जबाबदारी सगळ्यांची आहे,” असे म्हणत या प्रश्नी केंद्र सरकारने लक्ष घालण्याची मागणी त्यांनी केली.

दुष्काळाबद्दल पवार म्हणाले…
दुष्काळी दौऱ्याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, “हा दौरा करत असताना अनेक लोकांनी अनेक प्रश्न मला सांगितले. त्याबाबत मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहे. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांना मी एक पत्र पाठवले आहे. त्या पत्रामध्ये दुष्काळासह बाकी काही प्रश्न आहेत. या प्रश्ना संदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी बोलणार आहे. दौऱ्यात ज्या काही गोष्टी निदर्शनास आल्या त्याबाबत मी एक बैठक घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे विनंती करणार आहे. दुधाच्या प्रश्नासंदर्भातही काही प्रश्न आहेत. दुधासाठी येणारा खर्च आणि उत्पन्न याचा ताळमेळ बसत नाही. त्यामुळे दुधाची किंमत पाच रुपये प्रतिलटर प्रमाणे वाढून देण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे करणार आहे”, असेही शरद पवारांनी सांगितले.

माझी अन् त्यांची सहा महिन्यांपासून भेट नाही
त्यांच्या या विधानामागची पार्श्वभूमी काय हे मला माहीत नाही. माझी त्यांची वर्ष-सहा महिन्यांत भेट नाही. त्यामुळे त्यांच्या विधानबद्दल मला काही माहीत नाही असे शरद पवार म्हणाले. त्यांच्याकडून कोणताही संपर्क साधण्यात आलेल नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. आधी लोकसभा नतर राज्यसभेसाठी उमेदवारी न मिळाल्याने भुजबळ नाराज असल्याची चर्चा सुरू होती. त्यानंतर त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे संभ्रमाची स्थिती निर्माण झाली असून भुजबळांचं पुढलं पाऊल काय असेल याबद्दल तर्क-वितर्क सुरू आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या