Wednesday, June 26, 2024
Homeमुख्य बातम्याचोरट्याने १४ तोळे सोन्यासह रोकड केली लंपास

चोरट्याने १४ तोळे सोन्यासह रोकड केली लंपास

पेठ | प्रतिनिधी
पेठ शहरातील आंबेडकर नगर भागातील रामचंद्र देवराम पगारे या बाहेरगावी गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घरात शिरुन १४ तोळे सोन्याच्या दागिन्यांसोबत रोख रकमेसह पोबारा केल्याची घटना घडली आहे.

- Advertisement -

रामचंद्र पगारे हे आपल्या मुलाच्या आजारपणामुळे नाशिकला कुटुंबीयांसह गेलेले असल्याची संधी साधून भरवस्तीतील त्यांच्या घराचे कडी कोयंडा तोडून अज्ञाताने १,१०,९०० किमतीचा लक्ष्मीहार, ४९,९५० रुपये किमतीचे १ तोळ्याची सोन्याची चेन, दिडतोळ्याचा ३९,८७५ रुपये किमतीचा नेकलेस , २ तोळ्याचे ४९,०९० रुपये किमतीचे मणी मंगळसूत्र , दोन तोळ्याचा ५३,९३० रु किमतीचा नेकलेस, १०,५०० रुपये किमतीची चेन ,६६,१७० रुपये किमतीची चेन, १३,५०० रुपयाचे कानातील व ९०० रुपये किमतीची नथ असे एकुण ४,५०, ६१५ रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यासह १७,००० ची रोख रकमेची चोरी करून घरफोडी करण्यात आली.

हे ही वाचा : सावळघाटात ट्रक ना दुरुस्त झाल्याने वाहतुकीची कोंडी; वाहनांच्या दुतर्फा रांगा

दरम्यान, पेठ पोलिसांनी या घरफोडीची गंभीर दखल घेऊन श्वान पथकासह ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले. या चोरीत चोरट्याने वाहनाचा वापर केल्याचे दिसून येत असल्याने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणीचे कामकाज सुरु आहे. पोलीस निरिक्षक व्ही . एम पथवे यांचे मार्गदर्शनाखाली सपोउनि . जे जी . झिरवाळ, जाधव आदी तपास करीत असून सदर घटनेबाबत गुन्हा रजि. न ९६ / २०२४ भादवि कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या