Monday, June 24, 2024
Homeनाशिकसावळघाटात ट्रक ना दुरुस्त झाल्याने वाहतुकीची कोंडी; वाहनांच्या दुतर्फा रांगा

सावळघाटात ट्रक ना दुरुस्त झाल्याने वाहतुकीची कोंडी; वाहनांच्या दुतर्फा रांगा

पेठ | प्रतिनिधी
नाशिक – पेठ – बलसाड या राष्ट्रीय महामार्ग ८४८ महामार्गावरील सावळघाटात गुरवारी रात्री १० वाजेपासून वाहतुकीची कोंडी झाल्याचे पहायला मिळत आहे. यामुळे वाहतुक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. सावळघाटात ट्रक नादुरूस्त झाल्याने अरुंद रस्त्यावर वाहतुकीची सुविधा नसल्याने रस्त्याच्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या दोन्ही बाजुने किमान ५ ते ६ कि.मी. पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. स्थानिक पोलीस प्रशासनाच्या वतीने ही वाहतुक कोंडी फोडण्याचे काम सध्या सुरु असून दोन्ही मार्गावरील वाहतुक हळू हळू सोडण्यात येत आहे.

- Advertisement -

- Advertisment -

ताज्या बातम्या