Monday, May 25, 2026
HomeनाशिकPetrol-Diesel Price Hike: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सामान्य नागरिकांना झटका; पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा...

Petrol-Diesel Price Hike: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सामान्य नागरिकांना झटका; पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, नाशिकमध्ये असे आहेत दर

नाशिक | प्रतिनिधी
मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्याच्या पहिल्याच दिवसाची सुरुवात सर्वसामान्यांना दणका देणाऱ्या बातमीने झाली आहे.. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सातत्याने वाढताना पाहायला मिळत आहेत. गेल्या १० दिवसांत तेल कंपन्यांनी चौथ्यांदा इंधनाचे दर वाढवून सर्वसामान्यांना मोठा झटका दिला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, सकाळी ६ वाजल्यापासून दरात २.६१ रुपयांनी आणि डिझेलच्या दरात २.७१ रुपयांनी वाढ झाली आहे. नाशिकमध्ये ११२.४७ रुपये पेट्रोल तर ९९.११ रुपये डिझेलचे दर झाले आहे. यामुळे सामान्य नागरिकांचे हाल होत असून राज्यात अनेकठिकाणी इंधन टंचाईमुळे वाहणा चालक हैराण झाल्याचे समोर आले आहे.

गेल्या ४ वर्षापासून इंधनाच्या किमती स्थिर ठेवल्यानंतर, आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरु असलेल्या संघर्षामुळे १५ मे रोजी इंधनाचे दर ३ रुपयांनी वाढवण्यात आले होते आणि त्यानंतर १९ मे रोजी ९० पैशांनी दर वाढवले पुन्हा २३ मे ८७ पैशांनी दर वाढवले. यानंतर ही सुरू झालेली हा दरवाढीची मालिका अद्याप सुरूच आहे. आतापर्यंत चार वेळा केलेल्या वाढीमुळे पेट्रोल आणि डिझेल प्रति लिटर ७ रुपयांपेक्षा जास्त महाग झाले आहेत.

- Advertisement -

आंबेनळी घाटात भीषण अपघात; स्कॉर्पिओ ८०० फूट दरीत कोसळली, ८ तरुणांचा मृत्यू

देशभरातील इंधनाच्या दरात वाढ
दरवाढीनंतर आता दिल्लीत पेट्रोलची किंमत १०० रुपयांच्या पार गेली आहे. केवळ दिल्लीच नाही, तर इतर प्रमुख शहरांमध्येही इंधनाचे दर वाढले आहे. कोलकातामध्ये आता पेट्रोल 113.51 रुपये आणि डिझेल 99.82 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 111.21 रुपये तर डिझेलचा दर 97.83 रुपये प्रति लिटर झाला आहे. तसेच चेन्नईमध्ये 1 लिटर पेट्रोलसाठी 107.77 रुपये आणि डिझेलसाठी 99.55 रुपये मोजावे लागत आहेत. वाढत्या दरांमुळे वाहतूक खर्च वाढून दैनंदिन जीवनावरील महागाईचा दबाव अधिकच वाढत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सतत अस्थिर होत आहे. मध्य पूर्वेतील तणाव, होर्मुझच्या सामुद्रधुनीतील अडथळ्यांमुळे आणि जागतिक ऊर्जा संकट यामुळे पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. याचाच थेट परिणाम भारतीय बाजारात इंधन दरवाढीच्या रूपात दिसत आहे. दरम्यान, पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे देशात पुन्हा एकदा महागाईचा दबाव वाढण्याची चिन्हे दिसत असून नागरिकांनी पुढील काही दिवस सावध राहण्याचा इशारा देण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : नाशिकरोड कारागृह अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाबाहेर रंगली मद्यपार्टी; संशयित आरोपीच्या...

0
नाशिक | Nashik नाशिकरोड परिसरातील (Nashik Road Area) कारागृह अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाबाहेर रात्री उशिरापर्यंत मद्यपार्टी रंगल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे या पार्टीत एका...