नाशिक | Nashik
पश्चिम आशिया देशातील युद्धामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्चा तेलाचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० मे रोजी देशभरातील जनतेला इंधनाची बचत करा, असे आवाहन केले होते. या आवाहनानंतर सरकारने गेल्या पाच दिवसांत दोन वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. १५ मे रोजी देशात पेट्रोलच्या दरात ३ रुपये आणि डिझेलच्या दरात ३.११ रुपयांची वाढ करण्यात आली होती. मात्र, या दरवाढीला पाच दिवस उलटतात नाही तेच आता आज मंगळवारी (ता. 19 मे) पुन्हा एकदा देशातील प्रत्येक शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वेगवेगळी वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल प्रतिलिटर ८७ पैशांनी तर डिझेल प्रतिलिटर ९१ पैशांनी महागले आहे.
मुंबईत पेट्रोल १०७.५९ रुपये प्रतिलिटरवर पोहोचले आहे. तर डिझेल 94.08 रुपयांवर गेले आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा फटका आता सीएनजी वाहनधारकांनाही बसला आहे. दिल्ली आणि परिसरात (NCR) रविवारी सीएनजीच्या दरात प्रति किलो १ रुपयाची वाढ करण्यात आली. दोन दिवसांतील ही दुसरी वाढ आहे. या नवीन वाढीमुळे दिल्लीत सीएनजी ८०.०९ रुपये प्रति किलो झाला आहे, तर नोएडा आणि गाझियाबादमध्ये हा दर ८८.७० रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.
पडसाद : कांदा खरेदी? छे, ही तर ‘दरियामें खसखस’!
राज्यातील जिल्ह्यांमध्ये असे आहे इंधनाचे दर
पुणे
पुण्यात पेट्रोलचे दर आता १०७.८९ प्रति लिटर तर डिझेल ९४.३९ प्रति लिटर
नाशिक
नाशिकमध्ये पेट्रोलचे दर १०८.८४ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ९५.३५ रुपये प्रति लिटर
परभणी
परभणीत पेट्रोलचे दर १०९.४९ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९५.९६ रुपये प्रति लिटर
नागपूर
नागपूरात पेट्रोलचे दर १०८.०७ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ९४.६३ रुपये प्रति लिटर
मुंबई
मुंबईत पेट्रोलच्या किंमती १०७.५९ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ९४.०८ रुपये प्रति लिटर
ठाणे
ठाण्यात पेट्रोलचे दप १०७.९८ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ९४.४७ रुपये प्रति लिटर
वाशिम
वाशिममध्ये पेट्रोलच्या किंमती १०९ रुपये प्रति लिटर तर डिझेलच्या किंमती ९.५३ रुपये प्रति लिटर
सोलापूर
सोलापूरात पेट्रोलचे दर १०८.४१ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ९४.९३ रुपये प्रति लिटर
छत्रपती संभाजी नगर
छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोलचे दर १०९.१० रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ९५.५८ रुपये




