Friday, January 9, 2026
Homeदेश विदेशPetrol, Diesel Prices निवडणुका संपल्यानंतर सलग चौथी इंधन दरवाढ

Petrol, Diesel Prices निवडणुका संपल्यानंतर सलग चौथी इंधन दरवाढ

नवी दिल्ली :

पाच राज्यांतील निवडणुकांमध्ये स्थिर असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती मतमोजणीनंतर वाढण्यास सुरुवात झाली. सलग चौथ्या दिवशी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती (petrol and diesel price) आज पुन्हा वाढवल्या आहेत. पेट्रोलची किंमत प्रति लीटर 28 ते 30 पैशांनीतर डिझेलच्या किंमतीत 30 ते 35 पैसे वाढ झाली आहे. (Petrol, Diesel Prices Hiked)

- Advertisement -

महत्वाची बातमी : मुलांसाठी या लसीला मिळाली मंजुरी

YouTube video player

पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये 27 फेब्रुवारीपासून कोणतीही वाढ झाली नव्हती. मार्च महिन्यात उलट इंधनाच्या दरामध्ये चारवेळा कपात झाली. मात्र, आता आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे दर वाढल्याने भारतीय पेट्रोलियम कंपन्यांना इंधन दरवाढ करणे अपरिहार्य होते. मात्र, पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका सुरु असल्याने मोदी सरकारने दरवाढ रोखून धरली होती.

मुंबई आणि दिल्लीसह देशातील जवळपास सर्वच राज्यांत पेट्रोलची किंमत आतापर्यंतच्या उच्चांकावर पोहोचली आहे. मुंबईत पेट्रोलची किंमत वाढून प्रति लीटर 97.61 रुपये आणि डिझेलची किंमत प्रति लीटर 88.82 रुपये पर्यंत पोहोचली आहे. तर, दिल्लीत पेट्रोलची किंमत 91.27 रुपये तर, डिझेलची किंमत 81.73 रुपयांवर पोहोचली आहे.

ताज्या बातम्या

Sugarcane Fire : शॉर्टसर्किटमुळे ३ एकर ऊस जळून खाक; शेतकऱ्यांचे लाखो...

0
कोपरगाव (तालुका प्रतिनिधी) हाताशी आलेल्या पिकाचे डोळ्यादेखत नुकसान झाल्याने कोपरगाव तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. तालुक्यातील येसगाव शिवारात शुक्रवारी दुपारी शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत दोन...