Friday, May 1, 2026
Homeब्रेकिंग न्यूज"एक दिवस असा येईल, हिजाब घालणारी महिला…"; ओवेसींचा अजित पवारांवर हल्लाबोल, म्हणाले,...

“एक दिवस असा येईल, हिजाब घालणारी महिला…”; ओवेसींचा अजित पवारांवर हल्लाबोल, म्हणाले, अजित पवारांना मत म्हणजे…

सोलापूर | Solapur
राज्यातील २९ महापालिकांमध्ये असदुद्दीन ओवैसी यांची ‘एआयएमआयएम’ही निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने ओवैसी पक्षाच्या उमेदवारांसाठी ठिकठिकाणी सभा घेत आहेत. सोलापुरात अनेक जागांवर राष्ट्रवादी विरुद्ध एमआयएम असा सामना होत आहे. एमआयएमचे माजी शहराध्यक्ष आणि आताचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार तौफिक शेख यांच्या विरोधात असदुद्दीन ओवैसी यांनी सभा घेतली. यावेळी त्यांनी अजित पवारांवरही टीका केली.

अजित पवारांना मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत आहे, अशी टीका त्यांनी केली. त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे एक दिवस या देशाची पंतप्रधान हिजाब घातलेली महिला बनेल, असे विधान त्यांनी केले.

- Advertisement -

हिजाब घालणारी महिला देशाची पंतप्रधान बनेल
“सोलापूरला आपण पुण्यासारखे सुंदर बनवू शकतो. भाजपचे लोक इथे इतक्या वर्षांपासून आहेत, काहीच करत नाही. पाकिस्तानच्या घटनेत लिहलेय की एकाच धर्माचा माणूस राष्ट्रध्यक्ष बनू शकतो, इतर कोणी नाही. पण बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेत कोणीही भारतीय पंतप्रधान बनू शकतो. एक दिवस असा येईल, हिजाब घालणारी महिला या देशाची पंतप्रधान बनेल. तो दिवस बघण्यासाठी कदाचित मी जिवंत नसेन, पण हा दिवस एक ना एक दिवस नक्की येईल.”

“म्हणून भारतासोबतचा करार झाला नाही…”; अमेरिकेच्या वाणिज्य मंत्र्यांचा मोठा खुलासा, म्हणाले, मोदींनी एक फोन…

अजित पवारांना मत म्हणजे मोदींना मत
सोलापूरमध्ये अनेक प्रभागांमध्ये एमआयएम आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्यात सामना आहे. त्याच मुद्द्यावर बोलताना ओवैसी म्हणाले, “देशाच्या संसदेत बोलणारा मी आहे. अजित पवार हे नरेंद्र मोदींच्या मांडीवर बसले आहेत. अजित पवारांना मत म्हणजे मोदींना मत. अजित पवारांना मत म्हणजे मोदींनी आणलेल्या वक्फ कायद्याला समर्थन आहे.”

“अजित पवारांना दर्गा, मशि‍दीशी काही देणे-घेणे नाही. मोदी, शिंदे, अजित पवार हे त्रिमूर्ती एक आहेत. ते तुमच्यासमोर येऊन तुमच्या डोळ्यात धूळफेक करतील. त्यांना मतपेटीतून उत्तर द्यावे लागेल”, अशी टीका ओवैसींनी अजित पवारांवर केली.

असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, “या नई जिंदगी परिसरातूनच काही वर्षांपूर्वी तुम्हीच एमआयएमला संजिवनी दिली होती . आज एमआयएमला पुन्हा एकदा निवडून देण्याची विनंती करण्यासाठी मी आलो आहे. भाजप, आरएसएस, अजित पवार, शिंदेचे लोक या नई जिंदगी परिसराला बदनाम करण्याचे प्रयत्न करतात. त्यांना सगळ्यांना सांगणे आहे, हा परिसर असदुद्दीन ओवैसीचा आवडता आहे, हा परिसर सोलापूरचे हृदय आहे. जर तुम्ही या परिसराबद्दल काही चुकीचे बोललात तर मी तुमच्या बापाबद्दल बोलायला सुरु करेन.”

ताज्या बातम्या

LPG cylinder price hike : सर्वसामान्यांना मोठा झटका! LPG सिलिंडरच्या दरात...

0
मुंबई । Mumbai मे महिन्याची सुरुवात होताच कडक उन्हाच्या झळांसोबतच आता महागाईच्या झळांनीही सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. देशातील आघाडीच्या तेल विपणन कंपन्यांनी (IOC, BPCL, HPCL)...