Saturday, May 18, 2024
Homeदेश विदेशPetrol-Diesel Price : पेट्रोलचे दर स्थिर, डिझेल महागले

Petrol-Diesel Price : पेट्रोलचे दर स्थिर, डिझेल महागले

दिल्ली | Delhi

डिझेलच्या दरात (Diesel Price) आज रविवारी पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलचे दर (Petrol Price) स्थिर आहेत.

- Advertisement -

पेट्रोल दर (Petrol Price) आज जवळपास सलग २१ दिवस झाले स्थिर आहेत. डीझेल दर (Diesel Price) मात्र देशभरात २५ ते २७ पैशांनी वाढले आहेत. देशातील सर्वात मोठी इंधन विक्रेता कंपनी इंडियन ऑयल कॉर्पोरेशन (IOCL) नुसार देशाच्या राजधानीत पेट्रोल १०१.०१ रुपये आणि डिझेल २५ पैशांनी वाढून ८९.०७ रुपये प्रतिल लीटर दराने विकले जात आहे.

तेल कंपन्यांनी ०१ सप्टेंबर आणि ०५ सप्टेंबरला म्हणजेच आतापर्यंत २ वेळा पेट्रोल (Petrol) आणि डिझेल (Diesel) दरात १५-१५ पैसे रुपये प्रति लीटर इतकी कपात केली होती.

पेट्रोल होणार स्वस्त?

देशात पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) दर बऱ्याच काळापासून उच्च आहेत. त्याचबरोबर पेट्रोलची मागणीही झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत सरकारी रिफायनरी कंपन्या (Government refinery companies) कच्च्या तेलाची आयात वाढवत आहेत, आणि त्याचे उत्पादन वाढवण्यासाठी त्यांच्या ‘उत्पादन शैली’मध्ये बदलही करत आहेत.

भारत (India) जगातील कच्च्या तेलाचा तिसरा सर्वात मोठा आयातदार देश आहे. भारत सध्या प्रामुख्याने आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आखाती देशांवर अवलंबून आहे. परंतु अलीकडे, देशातील कच्च्या तेलाच्या आयात मिश्रणात पश्चिम आफ्रिका (West Africa) आणि अमेरिकेचा वाटा वाढला आहे. हे हलके दर्जाचे कच्चे तेल आहे, जे रिफायनरी कंपन्यांना अधिक पेट्रोलचे उत्पादन करण्यास मदत करते. तर डिझेल आणि केरोसिन सारखी इतर जड श्रेणीची इंधने आखाती देशांमधून येणाऱ्या कच्च्या तेलामध्ये मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या