Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशPetrol Disel Price : पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग दुसर्‍या दिवशी वाढ, जाणून घ्या...

Petrol Disel Price : पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग दुसर्‍या दिवशी वाढ, जाणून घ्या आजचे दर

दिल्ली | Delhi

देशात एकीकडे करोनाचा प्रादुर्भाव तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे अनेक जण बेरोजगार झाले आहेत. त्यातच गेल्या काही दिवसात देशात इंधनाची दरवाढ होत आहे. आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग दुसर्‍या दिवशी वाढ करण्यात आली. १५ मे पासून एका दिवसाच्या अंतराने किंमतीत सतत वाढ होत आहे, परंतु आज सलग दुसऱ्या दिवशी किंमती वाढल्या आहेत.

- Advertisement -

आज पेट्रोलच्या दरात लिटरमागे २५ पैशांनी वाढ झाली असून डिझेलच्या दरात प्रति लिटर २४ पैशांनी वाढ झाली आहे. आज दिल्लीत पेट्रोलची किंमत ९४.४९ रुपये आहे तर डिझेलची किंमत प्रति लिटर ८५.३८ रुपये आहे तर मुंबईत पेट्रोलची किंमत १००.७२ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९२.६९ रुपये प्रति लिटर आहे. पुण्यात आज पेट्रोलचा दर १००.४० रुपये लिटर तर डिझेलचा दर ९०.९५ रुपये लिटर झाला आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल ९५.९९ रुपये प्रति लीटर झाले आहे. तर डिझेल ९०.१३ रुपये प्रतिलिटर विकल्या जात आहे.

मे महिन्यातील १६ वी दरवाढ ठरली असून, त्यात पेट्रोल ३.८३ रुपयांनी, तर डिझेल ४.४२ रुपयांनी महाग झाले आहे. पश्चिम बंगालसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या काळात सरकारने इंधन दरवाढ रोखून धरली होती. निवडणुका संपताच दरवाढ सुरू करण्यात आली. ४ मे रोजी पहिली दरवाढ करण्यात आली होती. आतापर्यंत करण्यात आलेल्या १६ दरवाढीनंतर महाराष्ट्रासह राजस्थान, आंध्रप्रदेश आणि मध्यप्रदेश या राज्यांत अनेक ठिकाणी पेट्रोल शंभर रुपयांच्या वर गेले आहे. मुंबई, रत्नागिरी, परभणी, औरंगाबाद, जैसलमेर, श्रीगंगानगर, बन्सवाडा, इंदौर, भोपाळ, ग्वाल्हेर, गुंटूर आणि काकीनाडा यांचा त्यामध्ये समावेश आहे.

घरगुरी LPG गॅस सिलेंडर स्वस्त झाला कि महाग?

सरकारी तेल कंपन्यांनी LPG गॅस सिलेंडरच्या किंमतीत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. IOC ने 19 किलोग्रॅमच्या कमर्शिअल गॅस सिलेंडरच्या किंमतीत दिलासा दिला आहे. मात्र विना सबसिडी घरगुती LPG सिलेंडरच्या दरात आज कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मे मध्ये सुद्धा घरगुती सिलेंडरच्या दरात बदल करण्यात आला नव्हता. यामुळे सध्या तरी ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. मुंबईत घरगुती गॅस सिलेंडरची किंमत आज ८०९ रूपये आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या