Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजPhaltan Doctor Suicide Case: डॉ. मुंडे आत्महत्याप्रकरणात नवा ट्विस्ट; प्रशांत बनकरच्या बहिणाचा...

Phaltan Doctor Suicide Case: डॉ. मुंडे आत्महत्याप्रकरणात नवा ट्विस्ट; प्रशांत बनकरच्या बहिणाचा गौप्यस्फोट, म्हणाली, डॉक्टर तरुणीनेच…

सातारा | Satara
साताऱ्याच्या फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने केलेलं आत्महत्या प्रकरण सध्या राज्यभर गाजत आहे. तरुणीने आपल्या हातावर सुसाईड नोट लिहून आयुष्याचा शेवट केल. तिने पीएसआय गोपाल बदाने आणि प्रशांत बनकर दोघांवर गंभीर आरोप केले. दोघांच्या त्रासाला कंटाळून आपण आयुष्य संपवत असल्याचे देखील तरुणीने नोटमध्ये म्हटले. या प्रकरणात पीएसआय गोपाल बदने हा फरार असून बनकरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात बनकर याच्या बहिणीने मोठा गौप्यस्फोट केल्याने या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, प्रशांत बनकर याच्या वडिलांना आणि भावाला पोलिसांनी शुक्रवारी पोलिस स्टेशनलाच थांबवून ठेवण्यात आले होते. प्रशांतला कुठून अटक करण्यात आली नाही तर तो स्वत:हून घरात हजर झाला, तेथून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे प्रशांतच्या भावाने सांगितले आहे.

- Advertisement -

डॉक्टर तरूणीनेच प्रशांतला प्रपोज केले होते. मात्र, भावाने नकार दिला होता, असा खुलासा प्रशांतच्या बहिणीने केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टर तरूणी बनकर कुटुंबाच्या घरात राहत होती. ती पेइंग गेस्ट म्हणून राहत होती. प्रशांत बनकरच्या बहिणीने दिलेल्या माहितीनुसार, ‘डॉक्टर तरूणी वर्षभरापूर्वी आमच्या घरात पेइंग गेस्ट म्हणून राहायला आली. आमच्यात चांगले नाते होते.’

YouTube video player

नेमकं काय म्हणाली प्रशांतची बहिण
मी घरी आले की डॉक्टरला भेटायचे. ती आमच्याकडे रहायला होती.आमची एवढी मैत्री झाली होती, की ती सर्व मला सांगायची. मी नोकरी करायचे. मी तिला म्हणायचे की तुला चांगला सरकारी जॉब आहे. त्यावर ती म्हणालेली की आमच्या नोकरीत खूप तणाव आहे. ती खूप तणावातच असायची. या महिन्यात प्रशांत आठ दिवसांसाठी घरी आला होता. तो तिच्याशी घरातल्यांसारखेच बोलायचा. पुण्याला आला तेव्हा तिने त्याला मेसेजवर प्रपोज केला होता. त्यावर भावाने नाही मॅडम मी तुम्हाला घरातल्यासारखे मानतो, तुम्ही मला दादा म्हणता, असे म्हणत नकार दिला होता, असा गौप्यस्फोट प्रशांतच्या बहिणीने केला आहे. त्याचा या प्रकरणाशी काही संबंध नाही, त्याला अडकवलं जात असल्याचे प्रशांतच्या भावाने म्हटले आहे.

त्यांच्यात काय बोलण व्हायचं याचा तपास व्हायला पाहिजे
“डॉक्टरच माझ्या भावाला जास्त फोन करत होत्या. त्यांच्यात काय बोलणे व्हायचे, याचा तपास व्हायला पाहिजे. माझ्या भावाला अडकवले जातेय, असे मला वाटतेय. तो घरी फार नसतो. तो अधून मधून येत असतो. आता दिवाळीला आला होता. त्यांच्यात काय चॅटींग व्हायचे. यातून कोण कुणाला जास्त त्रास देत होते, याचा तपास व्हावा.”

‘माझ्या घरात दिवाळी फराळ करण्यासाठी डॉक्टर तरूणीने मदत केली होती. सर्वांसोबत फोटो काढला. तेव्हा माझ्या भावाने तिच्यासोबत फोटो काढला नाही. तेव्हा डॉक्टर तरूणी भडकली. तेव्हा मी त्यांना डिस्टर्ब आहात का? असा प्रश्न विचारला. तेव्हा त्यांच्या बोलण्यातून मेंटली डिस्टर्ब असल्याचं जाणवलं. मी त्यांना एके दिवशी जॉब करताय, चांगलं आहे, असं म्हणाले. तेव्हा डॉक्टर तरूणीने कामात खूप स्ट्रेस आहे, मेंटली टॉर्चर केलं जातं, असं सांगितलं’, अशी माहिती प्रशांत बनकरच्या बहिणीने दिली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Ahilyanagar : हार्वेस्टरद्वारे ऊस कापणीमुळे उत्पादनात घट नाही

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar हार्वेस्टर मशीनद्वारे ऊस कापणी केल्यास प्रति एकर सुमारे 15 टन उस उत्पादनात घट होते, अशी विनाकारण चर्चा घडवून आणण्यात येत आहे....