Friday, May 3, 2024
HomeUncategorizedPHOTO : निघाले बाल वारकरी, दुमदुमली अवघी नगरी

PHOTO : निघाले बाल वारकरी, दुमदुमली अवघी नगरी

पारनेर l तालुका प्रतिनिधी

आषाढी एकादशीच्या निमित्ताने सुपा परिसरातील सर्वच शाळानी शनिवारी सुप्यात दिंड्या काढल्या. दिवसभार चाललेला दिंडी सोहळा हजारो विद्यार्थी नागरिक यामुळे शनिवारी सुप्यात पंढरपूर अवतरल्याचा भास होत होता .

- Advertisement -

सावळे विठूराया, गोजीरी रूखुमाई व बाल वारकरी नाजुक टाळ वाजवत तर शाळकरी मुली काष्टी साड्या नेसुन डोक्यावर तुळस घेत हाताने टाळी वाजवत मुखाने हरीनाम घेताना दिसत होते. शनिवारी सुप्यात दिवसभर शहरासह आजुबाजुच्या शाळातील दिड्यानी सुपा गाव भक्ती सागरात दुमदुमुन गेले होते. यात सुपा हायस्कुलच्या शेकडो विद्यार्थीनी ढोल लेझीमसह पखवाद टाळ वाजवत संपूर्ण सुपा शहरात प्रदक्षिणा घातल्या.

यात शाळकरी मुला-मुलीनी वृक्षाची रोपे डोक्यावर घेत झाडे लावा त्याचे महत्व सागणारे फलक झळकावत वृक्ष दिंडी काढली. तर काही विद्यार्थीनी ग्रंथ दिंडी काढत पुस्तकाचे महत्व सागणारे फलक झळकावले होते. या अनोख्या व आवश्यक दिंडीला सुपेकरानी भरभरून दाद दिली. त्याचप्रमाणे सुपा गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थीनी शिक्षकानी पांरपारीक वेशभुषा करत हरीनामाचा गजर करत ग्रामप्रदक्षिणा घातली.

जांभुळवाडी जिल्हा परिषदेतील विद्यार्थी शाळा ते शहाजापुर रोड मळगंगाबाई मंदीर व दत्तनगर सुपा येथे पायी प्रदक्षिणा घातली यावेळी रहिवाशांनी वारकरी विद्यार्थ्यांना चाँक्लेट बिस्किटे दिली. तर सविता शिंदे यांनी विद्यार्थ्यांना नाष्टा दिला. दिवटे पाटील पब्लिक स्कुलच्या विद्यार्थ्यांनी गावातुन फेरी काढताना टाळ मृदुगाच्या तालावर फेर धरले तर विद्यार्थ्यांनी पावलीचा ठेका धरत भजन म्हटले.

तर माऊली शिक्षण संस्थेच्या एम ई टी स्कुलच्या विद्यार्थीनी आदर्श दिंडी काढत पालखी मार्गावर रांगोळ्याच्या पायघाड्या काढल्या. शिस्तबद्ध पद्धतीने भगवाधारी भालदार चोपदार, पांडुरंग, रूखुमाई त्यामागे पालखी रथ टाळ वाजवत ठेका धरत चाललेले वारकरी व त्यांना प्रोत्साहन देणारे हजारो नागरिक यामुळे शनिवारी सुपा गाव हरीनामात दुमदुमुन निघाले होते. विद्यार्थी पालक मान्यवर सर्वच या भक्तीसागरात ठुबुन निघालेले दिसत होते.

ऐरवी माँर्डन कपड्यावर आसणारे शिक्षक शिक्षिका नेहमिच मोबाईलमध्ये टोकावताना दिसतात. परंतु आज हे शिक्षण पांरपारीक कपडे घालून कपाळावर अंष्ठगंध लावून टाळी वाजवताना दिसत होते. आज सर्वच सरकारी व खाजगी शाळानी आषाढी वारीच्या निमित्ताने एकप्रकारे मार्केटिग केलेले जाणवत होते. यामध्ये स्पर्धा जाणवत होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या