Sunday, September 22, 2024
Homeजळगावphotos # फिंगर व नेल पेंटींगचा निसर्गदत्त राजा ‘आय.ए.राजा’

photos # फिंगर व नेल पेंटींगचा निसर्गदत्त राजा ‘आय.ए.राजा’

जळगाव jalgaon । डॉ. पंकज पाटील

- Advertisement -

चित्रकला किंवा पेंटींग करायची असेल तर रंग आणि ब्रश, कागद असे साहित्य लागतेच. पण ब्रश न वापरताही बोटांनी आणि नखांनी सुरेख, मोहक आणि आर्कषक असे चित्र काढणे म्हणजे एक निसर्गदत्त देणगीच म्हणता येईल. असे चित्र काढणारे दुर्मिळच आणि त्यांनी बोटांनी व नखांच्या (finger and nail painting) माध्यमातून काढलेले चित्रही एकमेवाव्दितीयच. असेच एक अवलिया चित्रकार आहेत इफ्तेखार अहमद राजा अर्थात आय.ए.राजा.(‘IA Raja’)

नावाप्रमाणे आय.ए. राजा खरोखर बोटांनी आणि नखांनी चित्र काढण्यात ते खरेखुरे राजेच आहेत. व्हिज़ीटींग कार्डापासून तर कागद, भिंत, काचेवर रंगाचे ठिपके ठेवताच त्यांची बोटे अशा रितीने फिरतात की पाहता पाहता सुंदर रंगसंगीतेच मोहक असे निसर्गचित्र तयार होते. त्यांची बोटेेे दोन, तीन रंगाचे मिश्रण अशा रितीने कागदावर पसरवली जातात की त्यातून सुंदर रंगसंगीतेचे आणि बोलके चित्र तयार होते. आणि पाहणारा ‘व्वा क्या बात है राजा जी’ असे म्हटल्याशिवाय राहत नाही.

आपल्या या कलेबाबत आय.ए. राजा सांगतात पेंटींगची आवड लहानपणापासून होती. प्रारंभी फायबरच्या तुकड्याने चित्र काढायचो. नंतर बोटांनी आणि नखांनी चित्र काढायला लागलो. आतापर्यंत 1 लाखाहून अधिक चित्रे काढली आहेत. त्यातील अनेक चित्रे रसीकांनी विकत घेतली आहेत. मुळचे खामगावचे असलेल्या आय.ए. राजा यांनी आतापर्यत अनेक पुरस्कार मिळवलेले आहेत. त्यांच्या या कलेची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये 2014 मध्ये झालेली आहे.

त्यांनी आतापर्यंत दिल्ली, मुंबई, बंगलोर, हैदराबाद,चेन्नई, पुणे, नाशिक, इंदूर नागपूर, गोवा, उज्जैंन यासारख्या शहरात त्यांच्या कलेचे प्रदर्शनही भरवले होते. त्यांना एशियन पेंट्स अवॉर्ड 2005 (22वी पेंट कॉन्फरन्स, मुंबई),बोधी फाउंडेशन पुरस्कार 2007 ,भारतीय कलाकार नेटवर्क. 2007 (जकार्ता, इंडोनेशिया)भारतीय कलाकार नेटवर्क. 2008 (जकार्ता, इंडोनेशिया)चैतन्य फाउंडेशन पुरस्कार 2013 खामगाव रतन 2014 या पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. आय.ए. राजा केवळ चित्रकारच नव्हे तर ते एक उत्तम गायकही आहेत. निसर्ग चित्र, फुले, महापुरूषांची चित्रे हे त्यांचे आवडीचे विषय आहेत. त्यांच्या चित्रांतून उर्जा आणि सकारात्मकेचे दर्शन होत असते.

केव्हीएल सोलर सिस्टीम करणार मदत

दरम्यान ही कला जळगावातील इच्छूकांना शिकवण्यासाठी केव्हीएल सोलर सिस्टीमने पुढाकार घेतला आहे.23 मार्चपूसन याचा श्रीगणेशा करण्यात येणार असल्याचे केव्हीएल सोलर सिस्टीमचे लोकेश मराठे यांनी सांगितले. तर याचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. शांताराम सोनवणे, नितीन चौबे, राजस कोतवाल,निलेश राजपूत यांनी या भेटीप्रसंगी केले.

कलेचे नवे वारसदार तयार करायचेत.. बोटांनी आणि नखांनी चित्र काढण्याची जी निसर्गदत्त म्हणा कि दैवी देणगी म्हणा ती केवळ माझ्यापुरता मर्यादीत न ठेवता ती कला जिंवत राहण्यासाठी तीचे नवे वारसदार तयार करायचे आहे. त्याच्या श्रीगणेशा जळगावातून करण्याचा मानस आय.ए. राजा यांनी ‘देशदूत’शी बोलतांना व्यक्त केला.

आय.ए. राजा

- Advertisment -

ताज्या बातम्या