Friday, May 3, 2024
HomeजळगावPhotos # पुरूषोत्तम एकांकिका करंडक स्पर्धा : अशा आहेत दुसर्‍या दिवसाच्या...

Photos # पुरूषोत्तम एकांकिका करंडक स्पर्धा : अशा आहेत दुसर्‍या दिवसाच्या एकांकिका

जळगाव : jalgaon

पुरूषोत्तम करंडक एकांकिका (Purushottam Karandak One Act) स्पर्धेच्या (competition) दुसर्‍या दिवशी सात एकांकिका (Seven one-act plays) सादर करण्यात आल्यात.

- Advertisement -

एकांकिका :- “हायब्रीड” -प्रताप महाविद्यालय, अमळनेर

भारतीय अर्थव्यवस्था ही मूलतः शेती वर अवलंबून आहे. पण शेती आणि शेतकरी ह्यांची अवस्था ही विदारक आहे. वाढती लोकसंख्या, कच्च्या मालाचा पुरवठा ह्यामुळे शेतीवर आलेला ताण रासायनिक खतांमुळे काही अंशी कमी झाला पण त्याचा दुष्परिणाम मात्र मोठ्‌या प्रमाणावर झाला. जसं की शेत जमिनीची नष्ट होत उत्पन्न क्षमता. त्याचप्रमाणे रासायनिक खतांच्या अती वापरामुळे आरोग्यावर ही दुष्परिणाम जाणवू लागले आहेत. अर्थव्यवस्था, आरोग्य, अन्न, तंत्रज्ञान पुरवठा ह्या सगळ्या चक्रात शेती आणि आताचा शेतकरी संभ्रम अवस्थेत आहे. हाच विचार सदर “हायब्रीड” एकांकिकेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पंढरी जो अल्पभूधारक शेतकरी आहे, उमा त्याची बायको तीचं शेती विषयक असणार तत्व खतांचा चालणारा काळाबाजार, शेतकऱ्यांची असणारी आत्ताची अवस्था ह्याची उदाहरण म्हणजे गणेश आणि संदीप ह्यांच्या मार्फत सदर एकांकिका विविध विषयांना घेऊन पुढे जात राहते.

एकांकिका – लज्जा दयावी सोडुन -एम.जी.एस.एम.संचालित कला शास्त्र व वाणिज्य महविद्यालय चोपडा

आताच्या धकाधकीच्या जिवनात मुलांना काहि गोष्टी आपल्या आई वडीलांसोबत बोलता येत नाहित. कारण त्या गोष्टी बोलायला साहजिकच आपल्या मनात लाज असते. परंतु अश्या वेळेला मनमोकळे पणे बोलणे म्हणजे लाज सोडुन निर्लज होणे असे नसते. पण अशा काहि गोष्टी आपल्या घरात बोलल्या गेल्या पाहिजे त्यासाठी लाज सोडुन देण हे गरजेच होउन जाते. या एकांकिकेत एक मुलगा तारुण्याच्या उंबरठ्यावर असतांना आपल्या आई वडिलांनी कर्तव्याच्या ओझ्याखाली आयुष्यातील काहि गोष्टी गमावता आहेत हे लक्षात आल्यावर, यासाठी त्याने काही वेळा करिता लाज सोडली. याच मोडलेल्या लाजेवर हि एकांकिका भाष्य करते.

उषःकाल होता होता -झुलाल भालीजीराव पाटील महाविद्यालय धुळे

या एकांकिकेमध्ये यंत्रणेच्या आणि कायद्याच्या धाकाचा बाप गैरवापर करून कसे एखाद्या अज्ञानी, मागास कुटुंबाचे आयुष्य खराब होवू शकते याचे चित्रण आहे

एक पारधी समाजातले कुटुंब गैरमार्ग सोडून मेहनत करत आपली पुढची पिढी सुधरवू पाहतय परंतू काही लोक शासकिय यंत्रणेचा गैरवापर करून त्यांना परत गैरमार्गाने जगायला प्रवृत्त करतात. याबद्दल या एकांकिकेत भाष्य केले आहे.

द डोअर स्टेप -पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय अमळनेर

आम्ही स्वर्गाच्या दरवाजाजवळ आहोत पण बसलेलो आमच्या साठी तो दरवाजा उघडत नाही आहे. कारण आम्ही आत्महत्या करून गुन्हा केला आहे. त्या मुळे त्या स्वर्गाच्या दरवाज्याच्या आत आम्हाला घेतल नाही जात आहे. आम्ही जर आत्महत्या जर नाही केली असती तर आम्हाला त्यांनी त्या स्वर्गाच्या दरवाज्याच्या आत घेतल असत. त्या आहे. कारणाने ते आम्हाला आत घेत नाही

एकांकिका पडदा -एम.जी.एस.एम महाविद्यालय

आयुष्याच्या तारुण्यात स्वतःच्या चुकीमुळे पडदा उघडल्याने एक मुलगी इतरांची भिती मनात ठेउन दडपणात ती हायमेनोप्लास्टी सर्जरी क्लिनिकला येते. याच दडपणामुळे तिच्या मनात विचारांचे वादळ मनात घोंगावते आणि समाजाच्या भीतीपोटी व आई वडीलांच्या इज्जतीसाठी ती पुन्हा एकदा पडदा बंद करण्याचा निर्णय घेते. समाजाने निर्माण केलेले पडदे ती उघडायाला घाबरतेय. ते पडदे म्हणजे नेमके काय? यावर हि एकांकिका भाष्य करते.

भानगड -शासकीय अभियांत्रिकी महविद्यालय औरंगाबाद 

ही एकांकिका, गावात राहणाऱ्या एका हतबल मुलीची कथा आहे. जिच स्वतःच कोणी नाही. वासनेने बरबटलेल्या पुरुषी जातीकडून तीच होणार शोषण, अनैतिक संबंधातून जन्माला आलेल तीच बाळ स्वतः च्या शारीरिक भुकेसाठी तिचा गैरफायदा घेणारी गावातील प्रतिष्ठित मंडळी, ज्यावेळी त्या बाळासोबत त्यांचं नाव जोडल्या जात त्यावेळी त्यांची होणारी फजिती आणि त्यातून त्यांची बाहेर येणारे खरे रूप, स्वतःची शारिरीक भूक भागवण्यासाठी कोणत्याही थराला जाणारी मानसिकता, त्यातून होणारे बलात्कार, फेकून दिली जाणारी मूल वाढत चालली आहेत, अश्या आरोपींना शिक्षेसोबत संस्कारचे धडे दिले पाहिजे म्हणजे अश्या घटना घडणार नाहीत. असा संदेश या एकांकिकेतून दिला आहे.

“आम्ही सगळे -देवगिरी महाविद्यालय औरंगाबाद

आपण भारतीय आहोत, आपल्या देशात मैला मैलांवर भाषा बदलते, वेशभूषा बदलते, रूढी परंपरा बदलतात, एव्हढी विवीधता असुन, आपण सर्व बंधू भावाने राहतो. भारतात असलेल्या जाती, धर्म, यांच्या मध्ये असलेले वाद, कितीही असो, तरी सर्व जन एकमेकांच्या सनात ऊत्साहात सहभाग घेतात, यातून भारतांच्या लोकांची अनेकता मधु एकता दिसते, पण तरीही प्रत्येकाच्या मनात दुसऱ्या जातीबद्दल धर्माबद्दल काही प्रमाणात द्वेष, हा असतोच. या द्वेषाची सुरुवात ही आपल्या घरापासून होते, आपण आपल्या पाल्यांचे गुरु असतो, आपण जस वर्तुनूक करत असतो त्याचप्रमाणे तेही तसेच करण्याचा प्रयत्न करत असतात, शाळेत जाणारा हा प्रत्येक मुलगा हा निरागस असतो तो मैत्री करताना जात धर्म कधीच पाहत नाही, पण जसजसे तो मोठा होत जातो समाजात असलेल्या भावना त्यांचे विचार परंपरा जातीभेद याच्यावरून त्यांच्या मनात एकमेकांबद्दल द्वेष निर्माण होतो, उच्च निचता यामुळे त्यांच्यात फुट पडु लागते यामुळे आपण लहानपणी पासून आपल्या पाल्यांना एकतेचे समानतेचे सल्ले दिले पाहिजे, भारत देशात सध्याच्या स्थितीला प्रत्येकाला समान अधिकार आहेत, प्रत्येक जण आपल्या हक्काची अमलबजावणी करु शकतो निसर्गात असलेल्या रंगांपैकी प्रत्येकाने आपापल्या झेंड्याचे रंग ठरवुन घेतले आहे. पण प्रत्येक भारतीयांच्या मनात एकच झेंडा असला पाहिजे तो म्हणजे तिरंगा हाच एकतेचा संदेश .

- Advertisment -

ताज्या बातम्या