Tuesday, May 7, 2024
Homeजळगावदो गज की दुरी...चा मास्तरांना विसर !

दो गज की दुरी…चा मास्तरांना विसर !

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

शाळा उघडण्यापूर्वी शिक्षकांना करोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने गुरुवारी जिल्ह्यातील शिक्षकांच्या चाचणीचे नियोजन करण्यात आले होते;

- Advertisement -

मात्र चाचणीसाठी आलेल्या शिक्षकांकडूनच फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडविण्यात आल्याचा प्रकार सर्वच ठिकाणी दिसून आला.

एकूणच विद्यार्थ्यांची जबाबदारी असलेल्यांकडूनच नियमांचे पालन होत नसेल तर शाळा सुरू होण्यापूर्वीच कोरोना प्रसाराची शक्यता नाकारता येत नाही.

शाळा सुरूहोण्याच्या पार्श्वभूीवर कोरोना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून 9 वी ते 12 पर्यतच्या शिक्षकाना कोविड चाचण्या अनिवार्य आहेत.

त्या अनुषंगाने स्वॅब नमुने संकलनासाठी बुधवार दि.18 नोव्हेंबरपासूनच जिल्हयात जळगाव शहरासह तालुकास्तरवर स्वॅब संकलन केंद्रावर व्यवस्था करण्यात आली होती.

त्यानुसार, जळगाव शहरातील शासकिय पॉलीटेक्नीक महाविद्यालयात गेल्या दोन तीन दिवसांपासून दररोज 300ते 400 च्या वर शिक्षकांनी उपस्थिती लावली होती,

मात्र यास्वॅब संकलनासाठी वैद्यकीय पथक तैनात असले तरी स्वॅबचे नमुने संकलन कार्य सुरू होताच शिक्षकांकडून फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला जावून एक प्रकारे महानायक अमिताभ बच्चन यांनी दिलेल्या दो गज दुरी…है या संदेशाचा विसार पडल्याचे चित्र सर्वत्र दिसत होते.

प्रसार होण्याची शक्यता…

जिल्ह्यात चार दिवसांत 13हजार 386 शिक्षक कर्मचार्‍यांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. यामध्ये जळगाव मनपा स्तरावर 78, जळगाव तालुक्यातील 44, अमळनेर 81, भडगांव 36, भुसावळ 62, बोदवड 12, चाळीसगांव 89, चोपडा 62, धरणगांव 43, एरंडोल 37, जामनेर 45, मुक्ताईनगर 26, पाचोरा 67, रावेर 62, यावल 60 असे 9वी ते 12 वी पर्यतची एकूण 857 वर्ग संख्या आहे. यामध्ये एखादा पॉझिटिव्ह आल्यास इतर सहकारी शिक्षकांना देखिल याचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या