Monday, May 27, 2024
Homeनगरपिकअपला खासगी बसने दिली धडक; तिन ठार, 12 जखमी

पिकअपला खासगी बसने दिली धडक; तिन ठार, 12 जखमी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर तालुक्यातील चास (Chas) शिवारात पुण्याहून नगरच्या दिशेने येताना थांबलेल्या पिकअपला खासगी बसने मागून जोराची धडक (Pickup and Private Bus Accident ) दिली. यात दोन पुरुष व एक महिला मयत (Death) झाली आहे. तर, अन्य बारा जण जखमी (Injured) झाले आहेत. मयत व जखमी हे बीड व धाराशिव जिल्ह्यातील आहेत. दिवाळीच्या निमित्ताने नगरमार्गे ते पुण्याहून बीडला (Beed) गावाकडे जात असताना शनिवारी पहाटे 4.40 वाजता ही दुर्दैवी घटना घडली.

- Advertisement -

नगरसह पाच बाजार समित्यांचा दांगट समिती करणार अभ्यास

चास शिवारात एका पेट्रोल पंपासमोर एक कार रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला जाण्यासाठी थांबली. त्यामागे पिकअपही (एमएच 12, एलटी 3913) येऊन थांबली. त्यानंतर काही सेकंदात मागून आलेल्या खासगी बसने (एमएच 43 बीपी 8435) पिकअपला धडक दिली. यात पिकअपमधील तिघांचा मृत्यू (Death) झाला. तर बारा जण जखमी झाले. तसेच, बस चालकही जखमी (Injured) झाला आहे. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी दाखल केले. पिकअप पुढे उभ्या असलेल्या कारचेही अपघातात (Accident) नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक युवराज चव्हाण पथकासह घटनास्थळी दाखल झाले. अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

अर्बनच्या अवसायकपदी गायकवाड यांची नियुक्ती

अपघातात सारिका कागदे, प्रविण कागदे (वय 26, दोघे रा. मोरगाव, जि. बीड), दीपक चव्हाण (रा. पखरूड, ता. भूम) हे मयत झाले आहेत. तर सुरज कागदे (वय 18), बजरंग कागदे (चालक), धीरज कागडे (वय 17), मच्छिंद्र कागदे, राहुल कागदे (वय 23), सीता कागदे, आरुषी कागदे (वय 9), आरती कागदे (वय 21), आरती कागदे (वय 15), श्रुती कागदे (वय 14, सर्व रा. मोरगाव, जि. बीड), धीरज जोगदंड (रा. पिंपळगाव, ता.वाशी, जि. धाराशिव) हे जखमी झाले आहेत.

मुलाच्या गळ्याला चाकू लावत लुटला सात लाखांचा ऐवज

- Advertisment -

ताज्या बातम्या