Tuesday, January 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजपिकअप वाहनाची गोडाऊनला धडक, वृद्ध मजुराचा जागीच मृत्यू

पिकअप वाहनाची गोडाऊनला धडक, वृद्ध मजुराचा जागीच मृत्यू

पिंपळगाव बसवंत | प्रतिनिधी Pimpalgaon Basvant

- Advertisement -

पिंपळगाव बसवंत येथील अंबिका नगर–मुखेड रोड परिसरात गुरुवारी (दि. २५) एक भीषण अपघात झाला. रिकाम्या गोडाऊनसमोर बसलेल्या वृद्ध मजुराला पिकप वाहनाने धडक दिल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातानंतर पिकप थेट गोडाऊनमध्ये घुसून शटर, पत्रे व कठाडे तोडून मोठे नुकसान झाले.

YouTube video player

महेश प्रभाकर खोडे यांच्या शेतमळ्यातील गोडाऊन श्री साई ज्ञानेश्वरी एंटरप्रायझेस यांना डीएफ तयार करण्यासाठी भाड्याने दिले आहे. घटनेच्या दिवशी डीएफ लोड झाल्यानंतर पिकप चालकाने चावी तशीच ठेवून वाहन सोडले. त्यानंतर प्लांटवरील एका युवकाने पिकप सुरू करण्याचा प्रयत्न केला, मात्र वाहनावर नियंत्रण न राहिल्याने ते वृद्धावर आदळले.

मयत वृद्धाचे नाव सावळीराम गांगुर्डे असून ते शेतमजुरी करून उदरनिर्वाह करत होते. मोठा आवाज झाल्याने नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

माहिती मिळताच पिंपळगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी नीरज गिरी (रा. गाझीपूर, म.प्र.) आणि पिकप मालक सचिन फकिरा सूर्यवंशी यांच्यावर निष्काळजीपणा व मृत्यूस कारणीभूत ठरण्याचे गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेनंतर वाहनांच्या सुरक्षिततेबाबत कडक उपाययोजनांची मागणी नागरिकांकडून होत आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : ६ जानेवारी २०२६ – नवा वाचनतोडगा

0
वाचनसंस्कृती रुजवण्याची गरज नुकत्याच सातारा येथे पार पडलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाली. उपमुख्यमंत्र्यांनी या संदर्भात केलेल्या घोषणेमुळे तिची आठवण पुन्हा...