Thursday, May 23, 2024
Homeमहाराष्ट्रSambhaji Bhide : संभाजी भिडेंच्या अडचणीत वाढ, हायकोर्टात याचिका दाखल

Sambhaji Bhide : संभाजी भिडेंच्या अडचणीत वाढ, हायकोर्टात याचिका दाखल

मुंबई | Mumbai

अमरावती येथील एका कार्यक्रमात शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे (Sambhaji bhide) यांनी महात्मा गांधी, शिर्डीचे साईबाबा आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबद्दल अपशब्द काढले होते. संभाजी भिडेंच्या वक्तव्यानंतर त्यांच्याविरोधात राज्यभर आंदोलन करण्यात येत आहेत. त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणीही केली जात आहे. त्यांच्याविरोधात राज्यभरातील अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीदेखील विधानसभेमध्ये कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून त्यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत आहे…

- Advertisement -

अखेर राहुल गांधींना खासदारकी बहाल! १३६ दिवसांनी संसदेत येणार

आता मुंबई हायकोर्टात (Mumbai Highcourt) संभाजी भिडे यांच्याविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. कुमार महर्षी (Kumar Maharshi) यांनी याचिका दाखल केली आहे.

या याचिकेवर आज मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर तातडीची सुनावणी होणार आहे. या याचिकेद्वारे कुमार महर्षी यांनी प्रसारमाध्यमे आणि समाजमाध्यमांमधून प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या महापुरुषांबाबतच्या आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्यांबाबतचा प्रसार रोखण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याची मागणी केली आहे.

राज्यात पावसाचा जोर कसा असेल? हवामान विभागाने दिली महत्वाची माहिती

तसेच महापुरूषांची बदनामी करणाऱ्यांची यादी तयार करून त्यांना प्रसारमाध्यमे किंवा समाजमाध्यमांतून वादग्रस्त टिप्पणी करण्यापासून मनाई करण्याचे आदेश राज्य सरकारला देण्याचीदेखील मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. महापुरुषांबद्दलची वादग्रस्त वक्तव्य समाजमाध्यमांद्वारे प्रसारित केली जात असून त्यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याचा दावा त्यांनी या याचिकेतून केला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या