Friday, July 5, 2024
Homeराजकीयशरद पवार अजित पवारांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत!

शरद पवार अजित पवारांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत!

पुणे । Pune

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) निकालनंतर राज्यातील राजकीय पक्षांचे समीकरण बदलतांना दिसत आहे. या निकालामध्ये मविआला (MVA) जास्त जागा मिळाल्या तर महायुतीला (Mahayuti) अपेक्षा पेक्षाही कमी जागा मिळाल्यामुळे या निकालाचा थेट परिणाम विधानसभा निवडणुकीवर (Assembly Elections) होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अशात अजित पवार (Ajit Pawar) यांच्यामुळे महायुतीला जास्त जागा जिंकता आले नाही असा आरोपही भाजप (BJP) नेत्यांसह आरएसएसने (RSS) केल्यामुळे महायुतीत राजकारण तापले आहे. याच दरम्यान, पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpari Chinchwad) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

शरद पवार (Sharad Pawar) हे अजित पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याची शक्यता आहे. पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीचे (NCP0 शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह १६ माजी नगरसेवकांनी शरद पवार यांची पुण्यातील मोदी बागेत शनिवारी भेट घेतली. हे सर्व जण शरद पवारांकडे परतण्यास इच्छुक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

दरम्यान या सर्व घडामोडीवर शरद पवार यांनी देखील सूचक विधान केले आहे. ते म्हणाले, पक्षात परत येण्याची इच्छा असलेल्या लोकांना भेटण्यासाठी मला रोज दोन-तीन तास द्यावे लागत आहेत. आजही काही लोक आम्हाला भेटायला येणार असून पक्षात येणारे लोक खूप आहेत.

यामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांचा अपवाद नाही. तिथल्या अनेक नगरसेवकांनी आमची भेट घेतली असून ते पक्षात परतण्यास इच्छुक आहेत. त्यांनी जो काही निर्णय अलीकडच्या काळात घेतला तो हिताचा नव्हता. या निष्कर्षाने ते परत येऊ लागले आहेत आणि ते परत आल्यास आम्ही त्यांचं स्वागत करू, असं शरद पवार म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या