मुंबई | Mumbai
महाराष्ट्रात विधानसभा निवडणकीचे वारे जारोने वाहू लागले आहे. काही दिवसांत आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्याआधी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाटच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोण असेल? याबाबतच्या चर्चेनं जोर धरला आहे. अशातच आता एक बातमी समोर आली आहे की लवकरच शिवसेना फुटीची कथा रंगमंचावर येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आयुष्यावर आधारीत एकपात्री नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘मला काही सांगायचंय’ या नावाचं नाटक लवकरच प्रेक्षकांना पाहता येईल. शिंदेंच्या राजकीय आयुष्यावर या नाटकाची कथा बेतलेली आहे. त्यामध्ये शिंदेंनी शिवसेनेत केलेल्या सर्वात मोठ्या आणि ऐतिहासिक बंडाचा समावेश असण्याची शक्यता आहे. सध्या हे नाटक सेन्सॉर बोर्डकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलेले आहे. दोन दिवसात याबद्दल अधिकृत घोषणा होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
नाटकाची उत्सुकता
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रा. डॉ. प्रदीप ढवळ लिखित या नाटकात एकनाथ शिंदे यांचं पात्र शिवसेना फुटीबद्दल नेमकं काय सांगणार? यातून काही नवीन सत्य समोर येणार आहे का? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.‘मला काही सांगायचंय – एकनाथ संभाजी शिंदे’ असे या नाटकाचे नाव असून हे एकपात्री नाटक आहे. प्राध्यापक, डॉ. प्रदीप ढवळ यांनी हे नाटक लिहिले आहे. ज्येष्ठ रंगकर्मी अशोक समेळ व अभिनेता संग्राम समेळ हे या नाटकाचे सादरीकरण करणार आहेत. प्रेरणा कला संस्थेने या नाटकाची निर्मिती केली आहे.
धर्मवीर, धर्मवीर २ चित्रपटांमध्ये दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघेंचे आयुष्य, त्यांचा जीवनप्रवास दाखवण्यात आला. त्यामध्येही एकनाथ शिंदेंची व्यक्तीरेखा पाहायला मिळाली. त्यानंतर शिंदेंच्या आयुष्यावर आधारित योद्धा कर्मयोगी या चरित्रग्रंथाचं प्रकाशन गेल्याच महिन्यात संपन्न झालं. यानंतर आता शिंदेंच्या आयुष्यावर बेतलेलं नाटक येणार आहे. हे नाटक एकपात्री असेल.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा