Friday, July 5, 2024
Homeब्रेकिंग न्यूजविशेष 'योग' साधत PM मोदींनी वाराणसीतून केला उमेदवारी अर्ज दाखल

विशेष ‘योग’ साधत PM मोदींनी वाराणसीतून केला उमेदवारी अर्ज दाखल

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणासीतून तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे. मोदी सगल तिसऱ्यांदा वाराणासी लोकसभा मतदार संघातून उमेदवार म्हणून उभे आहे. मोदी यांच्यासोबत भाजपातले प्रमुख नेते, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह एनडीएमधील घटक पक्षांचे नेते उपस्थित आहे.

- Advertisement -

आज गंगा सप्तमी आणि नक्षत्रराज पुष्य असा योगायोग आहे. या रवियोगाने ग्रहांची चांगली स्थिती निर्माण होत आहे. असे मानले जाते की या दिवशी कोणतेही काम केल्याने इच्छित मनोकामना पूर्ण होतात. पुष्य नक्षत्रात कोणतेही काम केल्यास त्याची पूर्णता निश्चित मानली जाते. या विशेष योगायोगानेच पंतप्रधान मोदींनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, मोदींनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी बनारस येथील दशाश्वमेध घाटावर दाखल झाले त्यानंतर त्यांनी कालभैरावाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत देत म्हणाले, ४०० पार ही देशाची भावना आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेसला एकही जागा मिळणार नाही, असा दावाही त्यांनी केला. तसेच, माझ्या आईच्या निधनानंतर, गंगा हीच माझी आई आहे आणि मला ‘गंगा मय्या’ने दत्तक घेतले आहे, असेही मोदी म्हणाले.

पुढे ते असे ही म्हणाले, गेल्या २०१४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते, मी येथे आलो नाही, मला येथे आणले गेले आहे. माता गंगेने मला बोलावले आहे. आता मोदी म्हणाले माता गंगेने मला दत्तक घेतले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी पंतप्रधान मोदी आपल्या आईच्या आठवणीने भावूक झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणासी लोकसभा मतदार संघातून दोनदा निवडणून आले आहे. वाराणासीत शेवटच्या टप्प्यात निवडणूक होत आहे. पंतप्रधानांनी २०१४ मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढवली होती, तेव्हा येथून आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी त्यांना आव्हान दिले होते. तर २०१९ मध्ये पंतप्रधानांनी समाजवादी पक्षाच्या शालीनी यादव यांचा ४ लाख ८० हजार मतांनी विजय मिळवला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या