नरेंद्र मोदी यांनी श्रीनगरमधील दल सरोवर परिसरात योगासने केली आहेत.
आज 10 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभरात साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीनगरमधील सरोवर परिसरात योगासने केली आहेत.
नरेंद्र मोदींनी ७ हजार नागरिकांसोबत योगासने केली आहे. नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशातील लोकांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्यांनी नागरिकांना योगासनाचे महत्त्व सांगितले आहे.
नरेंद्र मोदींनी श्रीनगरमधील योगासनाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. यावेळी त्यांनी नागरिकांसोबत सेल्फीदेखील घेतले आहेत.
तसेच आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारतीय जवानांनी बर्फाळ पर्वतांवर योगासने केली. सिक्कीमच्या मुगुथांग सब सेक्टरमध्ये 15 हजार फुटांपेक्षा जास्त उंचीवर ITBP जवानांनी योगासने केली आहेत. आयटीबीपीच्या जवानांनी लेहच्या करजोक आणि पँगॉन्ग त्सोमध्येही योगासने केली आहेत.
भारत-तिबेट सीमा पोलिसांच्या सैनिकांनी लडाखमध्ये 18,000 फूट उंचीवर योग दिन साजरा केला. जम्मूमध्ये सी. आर. पी. एफ. च्या जवानांनीही योगा केला.
लडाखमधील सीमा चौकीजवळ 15,000 फूट उंचीवर आयटीबीपीच्या जवानांनी केलेल्या योगासनांचा व्हिडियो सर्वत्र व्हायरल होत आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयटीबीपीच्या जवानांनी उत्तर सिक्कीमधील मुगुथांग सब सेक्टर येथे 15,000 फुटांपेक्षा जास्त उंचीवर योगासने केली.